पालिकेची ऑनलाईन सभा ऑफलाईन पुन्हा घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2020 04:18 AM2020-12-27T04:18:29+5:302020-12-27T04:18:29+5:30
वडगाव नगरपालिकेची मंगळवारीची ऑनलाईन झालेली सभा पुन्हा ऑफलाईन घेण्यात यावी अशी मागणी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे सत्तारूढ युवक ...
वडगाव नगरपालिकेची मंगळवारीची ऑनलाईन झालेली सभा पुन्हा ऑफलाईन घेण्यात यावी अशी मागणी मुख्याधिकारी, जिल्हाधिकारी यांच्याकडे सत्तारूढ युवक क्रांती आघाडीतील १२ नगरसेवकांनी निवेदनातून केली आहे.
मंगळवारी २२ डिसेंबरची पालिकेची सर्वसाधारण सभा ऑनलाईन होती. सभेच्या सुरुवातीपासून इंटरनेट खराब होते. त्यामुळे आवाज येत नव्हता. नेमका काय विषय चाललाय हे समजत नव्हते. अनेक सदस्यांना नेटवर्क नसल्यामुळे उपस्थित राहता आले नाही.
विषयपत्रिकेवरील १३, तर आयत्या वेळेच्या आठ विषयांवर चर्चा झाली नाही. त्यामुळे ही सभा नव्याने (फेर) सभा सभागृहात फिजिकल डिस्टन्सिंग पाळून घ्यावी.
या निवेदनावर गटनेत्या प्रविता सालपे, उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, सुनीता पोळ, सावित्री घोटणे, शबनम मोमीन, मैमुन कवठेकर, नम्रता ताईगडे, अलका गुरव, कालिदास धनवडे, संतोष गाताडे, शरद पाटील, संदीप पाटील, आदींच्या सह्या आहेत.