कोरोनाबाबतची दक्षता घेऊनच आमची परीक्षा घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:25 AM2021-04-07T04:25:26+5:302021-04-07T04:25:26+5:30

कोल्हापूर : करिअरच्यादृष्टीने यंदाचे वर्ष आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची आवश्यक ती दक्षता घेऊनच आमची परीक्षा घ्या. भले त्यासाठी ...

Take our test with caution about corona | कोरोनाबाबतची दक्षता घेऊनच आमची परीक्षा घ्या

कोरोनाबाबतची दक्षता घेऊनच आमची परीक्षा घ्या

Next

कोल्हापूर : करिअरच्यादृष्टीने यंदाचे वर्ष आमच्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यामुळे कोरोनाबाबतची आवश्यक ती दक्षता घेऊनच आमची परीक्षा घ्या. भले त्यासाठी ऑनलाईन पध्दती वापरता येईल का? याचा विचार राज्य शासनाने करावा, अशी मागणी कोल्हापुरातील दहावी, बारावीचे विद्यार्थी, पालक, शिक्षकांतून होत आहे.

शासनाने आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना विनापरीक्षा उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे परीक्षा घेण्यात येणार की रद्द होणार, याबाबत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली असून त्यांना धाकधूक लागली आहे. त्याबाबत शासनाने लवकर स्पष्ट आदेश द्यावेत, अशी मागणी पालक करीत आहेत.

बारावीची परीक्षा दि. २३ एप्रिल ते दि. २१ मेदरम्यान, तर दहावीची परीक्षा दि. २९ एप्रिल ते दि. २० मे या कालावधीत होणार आहे. त्यासाठी एकूण २,५९६२८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. कोरोनामुळे जूनपासून दहावी, बारावीचे ऑनलाईन, तर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नोव्हेंबरपासून या इयत्तांचे ऑफलाईन वर्ग भरले. या दोन्ही पध्दतीतून गेले वर्षभर शिक्षण घेत विद्यार्थ्यांनी परीक्षांची तयारी केली. मात्र, आता तोंडावर परीक्षा आलेल्या असताना पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढू लागल्याने आणि आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द झाल्याने दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्याबाबत शासनाने स्पष्ट आदेश लवकरात लवकर देण्याची आवश्यकता आहे.

चौकट

या पर्यायांचा विचार करता येईल...

कोरोनाबाबतचा राज्यभरातील विचार करता, ऑफलाईन परीक्षा घेणे शक्य नसल्याचे दिसते. त्यामुळे एक तर टप्प्या-टप्प्याने ऑनलाईन परीक्षा घ्यावी अथवा इयत्ता नववी. अकरावीतील गुणांवर आधारित, संकलित पध्दतीने मूल्यमापन करून दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेशित करावे, असा पर्याय असल्याची प्रतिक्रिया माध्यमिक शिक्षक राजेश वरक यांनी दिली.

कोल्हापूर विभागातील आकडेवारी दृष्टिक्षेपात...

दहावीची विद्यार्थी संख्या : १३८४५९

मुख्य, उपकेंद्रांची संख्या : २४८६

बारावीची विद्यार्थी संख्या : १२११६९

मुख्य, उपकेंद्रांची संख्या : ९२५

Web Title: Take our test with caution about corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.