कर्ज काढा, परंतु शेतकऱ्यांना कर्ज द्या- चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2020 04:33 AM2020-06-23T04:33:25+5:302020-06-23T04:33:37+5:30
शेतकऱ्यांचा बँकांमध्ये वारंवार होत असलेला अपमान यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. तेव्हा वेळ पडली तर कर्ज काढा, परंतु शेतक-यांना कर्ज द्या, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली.
कोल्हापूर : कोरोनाच्या लॉकडाऊनचा मार, तूर, हरभरा, कापसाचे शासनाने केलेले बेहाल, कागदावरच राहिलेली कर्जमाफी आणि पीककर्ज मागणाºया शेतकऱ्यांचा बँकांमध्ये वारंवार होत असलेला अपमान यामुळे बळीराजा हवालदिल झाला आहे. तेव्हा वेळ पडली तर कर्ज काढा, परंतु शेतक-यांना कर्ज द्या, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. कर्जमाफी आणि पीककर्ज वाटप या मुद्यावर सोमवारी भाजपने राज्यव्यापी आंदोलन केले. चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापुरात जिल्हाधिकारी दौलत देसाई यांना मागणीचे निवेदन दिले.
पाटील म्हणाले, दोन लाखांपर्यंत कर्ज माफ करण्याची घोषणा मोठ्या धडाक्यात मुख्यमंत्र्यांनी केली. परंतु, सहा महिने झाले, १८ लाख शेतकºयांच्या नावांची यादीच आली नाही. पहिल्या यादीतच अनेक शेतकºयांचे आधार प्रमाणीकरण झाले नाही. टोळधाळीच्या नुकसानीची दखलच घेतली नाही. अनेक जिल्ह्यांमध्ये विमा कंपन्याच आल्या नाहीत. शासनामध्ये कोणालाच शेतकºयांच्या समस्यांबद्दल सोयरसुतक नाही, असे निवेदनात नमूद केले आहे. निवेदनाची प्रत मुख्यमंत्र्यांनाही पाठविण्यात आली आहे.
>महाबीजवर कारवाई करा - देवेंद्र फडणवीस
राज्य सरकारने अनुदान थांबविल्याने महाबीजने यंदा महागात बियाणे विकले आणि हे महाग बियाणे खरेदी करून सुद्धा ते बोगस निघाले. यामुळे शेतकºयांची पिळवणूक होत असून, दोषींवर तत्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे