बाजार समितीची कळंब्यातील जागा ताब्यात घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:21 AM2020-12-08T04:21:12+5:302020-12-08T04:21:12+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क काेल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची कळंब्यातील जागा तातडीने ताब्यात घ्या, अशी सूचना बाजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
काेल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या मालकीची कळंब्यातील जागा तातडीने ताब्यात घ्या, अशी सूचना बाजार समितीच्या अशासकीय मंडळाने बैठकीत केली. इतर न्यायालयीन प्रलंबित प्रकरणाना गती देण्याचा निर्णयही झाला.
बाजार समितीच्या प्रलंबीत न्यायालयीन प्रकरणांबाबत सोमवारी वकिलांसोबत अशासकीय मंडळाची बैठक झाली. समितीच्या विरोधात पन्नासहून अधिक केसेस न्यायालयात आहेत. जिल्हा न्यायालय, कामगार न्यायालयापासून उच्च न्यायालयापर्यंत अनेक प्रकरणे प्रलंबित आहेत. गेली अनेक वर्षे या प्रकरणावर लाखो रुपये खर्च होत आहे. याबाबत आढावा घेण्याचा निर्णय अशासकीय मंडळाने घेतला. त्यानुसार सोमवारी अध्यक्ष के. पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थित बैठक झाली. यामध्ये प्रामुख्याने कळंबा येथील ३०-३५ एकर जागा दहा वर्षे मुदतीने भाड्याने दिली आहे. मात्र, याविरोधात संबंधित भाडेकरू न्यायालयात गेला आहे. याप्रमाणे अनेक मालमत्तांबाबत न्यायालयात प्रलंबित प्रकरणे आहे. काही कर्मचारीही न्यायालयात गेले आहेत, याबाबतही तातडीने निर्णय घेण्याबाबत पावले उचलावीत, अशी सूचना सदस्यांनी केली. बैठकीला अशासकीय मंडळाचे सदस्य प्रा. जालंदर पाटील, कल्याणराव निकम, सचिन घोरपडे, डी. जी. भास्कर, ॲड. आर. एल. चव्हाण आदी उपस्थित होते.
- राजाराम लोंढे