बांधकाम कामगाराच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:22 AM2021-03-19T04:22:04+5:302021-03-19T04:22:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सडोली (खालसा) : बांधकाम संघटना कामगारांचे शासकीय अधिकारी कामात अडवणूक करून शोषण करत असतील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
सडोली (खालसा) : बांधकाम संघटना कामगारांचे शासकीय अधिकारी कामात अडवणूक करून शोषण करत असतील तर त्यांना वठणीवर आणण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरू, असे प्रतिपादन अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संजय पवार यांनी केले.
ते हळदी (ता. करवीर) येथे स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड वाटप व नूतन ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्कार समारंभ प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे संचालक प्रा. शिवाजीराव पाटील होते.
प्रा. शिवाजीराव पाटील म्हणाले,
कामगार व शेतकऱ्यांचे हात थांबले तर देश थांबेल एवढी मोठी जबाबदारी या दोन्ही यंत्रणा पार पडत आहेत. कामगारांच्या अडचणी वेळी संघटनांनी दिलेली साथ त्यांना मोठा आधार ठरते.
यावेळी देवाळे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संजय धुमाळ यांची निवड झाल्याबद्दल विशेष सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन दयानंद कांबळे यांनी तर स्वागत प्रास्ताविक संजय धुमाळ यांनी केले. यावेळी जोतीराम मोरे, तानाजी तावडे, मच्छींद्र कांबळे, संजय सुतार यांनी मनोगते व्यक्त केली.
कार्यक्रमास रझाक अत्तार, प्रशांत कांबळे, के.पी. पाटील, संजय जाधव, डी.जी. पाटील, सर्जेराव पाटील आदी उपस्थित होते.
फोटो : १८ हळदी
हळदी (ता. करवीर) येथे स्वराज्य जनरल कामगार सेनेच्या वतीने आयोजित बांधकाम कामगारांना स्मार्ट कार्ड वाटप करताना संजय पवार, शिवाजीराव पाटील, संजय धुमाळ, डी. जी. पाटील व इतर.