ताण पळवा, स्वास्थ्य मिळवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2017 12:16 AM2017-08-03T00:16:34+5:302017-08-03T00:16:34+5:30

Take the stress, get health | ताण पळवा, स्वास्थ्य मिळवा

ताण पळवा, स्वास्थ्य मिळवा

Next
ठळक मुद्देकुटुंबातील ताण- तणाव, अपयशाची भीती, नैराश्य या गोष्टी टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला, उपचार घेणे तर गरजेचे


ताण कोणाला नसतो. तो सर्वांनाच असतो, पण तो अति झाला की त्याचे आपल्यावर शारीरिक, मानसिक परिणाम होऊ लागतात. हा ताण कशामुळेही येऊ शकतो. तो कामामुळे आला आहे की अन्य कशामुळे यावरून त्यावर उपाय काय करावयाचा हे ठरवता येते. त्यामुळेच डॉक्टरांकडे तुम्ही गेला की सर्वप्रथम ते कशामुळे ताण आला आहे, याचा शोध घेतात आणि औषधगोळ्या द्यायचे की समुपदेशनावर भागवायचे याचा निर्णय घेतात. करवीर पंचायत समितीच्या बाळकृष्ण गुरव या कनिष्ठ लिपिकाने विषारी औषध पिऊन आणि तुळशी नदीत उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्याला शेतकºयांनी वाचविले. पण रुग्णालयात उपचार सुरू असताना अखेर त्याचे निधन झाले. सध्या झिरो पेंडन्सीसाठी शासकीय कार्यालयांमध्ये लगबग सुरु आहे. यासाठी वरिष्ठांकडून अतिरिक्त कामासाठी दबाव आणला जात आहे. कामाच्या या अतिताणामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांसह जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी केला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या कर्मचाºयांनी काम बंद आंदोलनही केले. यामुळे कामाच्या अतिताणाचा मुद्दा सर्वत्र चर्चेचा विषय झाला आहे.
खरंतर आजच्या धकाधकीच्या जीवनात ताण ही एक सार्वत्रिक समस्याच बनली आहे. कोणतेही क्षेत्र असो, की घर. तेथे काहीना काही ताणतणाव असतातच. या ताण-तणावाला आपण कसे सामोरे जातो. यावर त्याचे कमी जास्त परिणाम आपल्यावर होत असतात. अशा परिस्थितीत आपल्या मनाची अवस्था अतिशय खंबीर अन् निग्रही असेल तर या ताण-तणावातून सहीसलामत बाहेर पडता येते. जर मनच अस्वस्थ असेल तर त्याचा परिणाम आपल्या रोजच्या जगण्यात जाणवू लागतो. नैराश्य येते किंवा चीडचिडेपणा येतो. मुळात ताण कशामुळे येऊ शकतो याचा अंदाज घेवून तो येऊ नये यासाठी आधीच उपाययोजना करता आली तर बºयाच समस्या सुटू शकतात. यासाठी आपल्या वागण्यात एक प्रकारची शिस्त असली पाहिजे. कामात प्रामाणिकपणा असला पाहिजे. कामे वेळच्यावेळी हातावेगळी करण्याची हातोटी असली पाहिजे. कार्यालयीन कामकाजातील कामाचा ताण अधिक येत असेल तर तो कशामुळे येतोय. कर्मचारी कमी आहेत का, असलेले कर्मचारी कामचुकारपणा करतात का? त्यांच्या क्षमतेपेक्षा जादा काम आहे का? याचा विचार शासकीय कार्यालये असोत की खासगी कार्यालये तेथील वरिष्ठांनी केला पाहिजे. आपल्या कर्मचाºयांसाठी कामाचे ठिकाण एखाद्या घरासारखे खेळीमेळीचे असले पाहिजे. आनंददायी असले पाहिजे. ते नसेल तर त्याचा परिणाम कर्मचाºयांवर होतो. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना निर्माण होते. हाच निकष आपण घरातही लावू शकतो. बाहेर कुठेतरी घडलेल्या घटनेचा राग घरातील माणसांवर काढण्याचा प्रकार सर्रास घडतो. कारण बॉसला किंवा वरिष्ठांना बोलण्याची सोय नसते. त्यामुळे राग काढण्यासाठी पत्नी आणि मुले ही हक्काची माणसे असतात. पत्नी, मुलेही समंजस असतील तर ठीक नाहीतर मग घरात भांडणे होतात. त्यातून मग कौटुंबिक स्वास्थ्यही हरवते. मग ते शोधण्यासाठी अन्य मार्गाचा अवलंब केला जातो अन्यथा जीवन संपविण्याचा विचार मनात घोळू लागतो. यातून वेळीच बाहेर पडण्याची गरज असते. यासाठी सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आपल्या व्यथा आपल्या विश्वासू माणसांजवळ व्यक्त केल्या पाहिजेत. यासाठी कुटुंबात तसेच मित्रमंडळींमध्ये चांगला संवाद असला पाहिजे. त्यातून एकमेकाला आधार मिळू शकतो. कामाच्या अतिताणामुळे पोलिसांनी आत्महत्या केल्याच्या घटना काही वर्षापूर्वी ऐकावयास मिळत असत. आता शासकीय कर्मचारीही तसा विचार करु लागले तर ती एक धोक्याची घंटा ठरू शकते. कर्मचाºयांकडून जास्तीत जास्त काम करून घेताना त्यांचे मानसिक स्वास्थ्य हरवणार नाही याची काळजी घ्यायलाच हवी. शिवाय कुटुंबातील ताण- तणाव, अपयशाची भीती, नैराश्य या गोष्टी टाळण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला, उपचार घेणे तर गरजेचे आहेच पण नियमित व्यायाम, योगासने, प्राणायाम हेही मानसिक स्वास्थ्य टिकविण्याना टोकाचा विचार न करता आत्मविश्वासाने तोंड देण्याची, मार्ग काढण्याची शक्ती आपल्याला मिळेल.
- चंद्रकांत कित्तुरेसाठी आपले शरीर सदृढ आणि आरोग्यदायी ठेवण्यासाठी मदत करतात. त्यामुळे याकडेही वळायला हवे. असे झाले तर कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाता

Web Title: Take the stress, get health

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.