सरकारसमवेतच्या चर्चेसाठी तुमच्यातील अभ्यासू समन्वयकांना सोबत घेऊन जाणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:16 AM2021-06-17T04:16:46+5:302021-06-17T04:16:46+5:30

येथील मूक आंदोलनानंतर लॉंगमार्चच्या नियोजनाबाबत सकल मराठा समाजातील राज्यभरातील समन्वयकांसमवेत आयोजित बैठकीत ते बाेलत होते. यावेळी संयोगीताराजे छत्रपती उपस्थित ...

Take your studious coordinators with you for discussions with the government | सरकारसमवेतच्या चर्चेसाठी तुमच्यातील अभ्यासू समन्वयकांना सोबत घेऊन जाणार

सरकारसमवेतच्या चर्चेसाठी तुमच्यातील अभ्यासू समन्वयकांना सोबत घेऊन जाणार

Next

येथील मूक आंदोलनानंतर लॉंगमार्चच्या नियोजनाबाबत सकल मराठा समाजातील राज्यभरातील समन्वयकांसमवेत आयोजित बैठकीत ते बाेलत होते. यावेळी संयोगीताराजे छत्रपती उपस्थित होत्या. कोल्हापुरातील मूक आंदोलनासाठी ताकद उभी केल्याबद्दल सर्व समन्वयकांना मी धन्यवाद देतो. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागण्यांबाबत चर्चेसाठी दि.४ जून रोजी मला फोन केला होता. मात्र, मी त्यांना चर्चेसाठी एकटा येणार नाही. समन्वयकांसमवेत येणार असून त्यावेळी मुख्यमंत्रीही असावेत असे सांगितले होते. ज्या मागण्यांची पूर्तता करणे राज्य शासनाच्या हातात आहे. त्याबाबत चर्चा करण्यासाठी सरकारने निमंत्रण देणे ही आपल्यादृष्टीने सकारात्मक बाब आहे. त्याचे आपण स्वागत करू या. कोरोनाची स्थिती आणि सरकार आपल्या मागण्याबाबत यावर्षी आणि पुढील वर्षी काय देवू शकते याचा बारकाईने अभ्यास करून आपण चर्चेला जाऊ या. त्यासाठी आपल्यातील तज्ज्ञ, अभ्यासू समन्वयकांची आपण नावे द्यावीत. विद्यार्थ्यांनी त्यांच्यातील अभ्यासू प्रतिनिधी द्यावा. आमच्यावर विश्वास ठेवा आम्ही योग्य मार्ग काढू, असे खासदार संभाजीराजे यांनी सांगितले. आपल्या मागण्यांच्या पूर्ततेबाबत सरकारकडून काहीच झाले नाही, तर लॉंगमार्च काढण्यात येईल. त्याची तयारी सुरू राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यभरातील समन्वयक सहभागी

राजेंद्र कोंढरे (पुणे), करण गायकर, गणेश कदम (नाशिक), अंकुश कदम (नवी मुंबई), विनोद साबळे (रायगड), रघुनाथ चित्रे पाटील, धनंजय जाधव (पुणे), रमेश केरे, अप्पासाहेब कुडेकर (औरंगाबाद), महेश गवळी, सज्जनराव साळुंके, जीवनराजे इंगळे (उस्मानाबाद), नीलेश देशमुख (बुलडाणा), महादेव देवसरकर (नांदेड), गंगाधर काळकुटे, पूजा मोरे (बीड), वीरेंद्र पवार (मुंबई), माऊली पवार (सोलापूर), रमेश आंब्रे, प्रवीण पिसाळ (ठाणे), व्यंकट शिंदे (लातूर), ॲड. सुहास सावंत (सिंधुदुर्ग), संजय पाटील, नितीन शिंदे (सांगली), विवेकानंद बाबर, रफिक शेख (सातारा) आदी समन्वयक मूक आंदोलनात सहभागी झाले.

फोटो (१६०६२०२१-कोल-समन्वयक बैठक ०१ व ०२) : कोल्हापुरात बुधवारी सकल मराठा समाजाच्या मूक आंदोलनानंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजातील राज्यभरातील समन्वयकांसमवेत लॉंगमार्चच्या नियोजनाबाबत चर्चा केली. (छाया : नसीर अत्तार)

===Photopath===

160621\16kol_3_16062021_5.jpg~160621\16kol_4_16062021_5.jpg

===Caption===

फोटो (१६०६२०२१-कोल-समन्वयक बैठक ०१ व ०२) : कोल्हापुरात बुधवारी सकल मराठा समाजाच्या मूक आंदोलनानंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजातील राज्यभरातील समन्वयकांसमवेत लॉंगमार्चच्या नियोजनाबाबत चर्चा केली. (छाया : नसीर अत्तार)~फोटो (१६०६२०२१-कोल-समन्वयक बैठक ०१ व ०२) : कोल्हापुरात बुधवारी सकल मराठा समाजाच्या मूक आंदोलनानंतर खासदार संभाजीराजे यांनी मराठा समाजातील राज्यभरातील समन्वयकांसमवेत लॉंगमार्चच्या नियोजनाबाबत चर्चा केली. (छाया : नसीर अत्तार)

Web Title: Take your studious coordinators with you for discussions with the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.