प्राध्यापकांचे रुजू अहवाल घेऊन अधिष्ठाता सिंधुदुर्गकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:26 AM2021-05-20T04:26:34+5:302021-05-20T04:26:34+5:30
कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३३ प्राध्यापकांना सिंधुदुर्ग येथे नव्याने उभारण्यात ...
कोल्हापूर येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील ३३ प्राध्यापकांना सिंधुदुर्ग येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडे रुजू करून घेण्यात आले आहे.
येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे यांच्याकडेच सिंधुदुर्ग महाविद्यालयाचा प्रभारी कार्यभार आहे. कोल्हापूर येथील महाविद्यालयातील ३३ वैद्यकीय प्राध्यापकांची बदली सिंधुदुर्गला करण्यात आली आहे. त्या सर्वांचे रुजू अहवाल घेऊन डॉ. मोरे बुधवारी सिंधुदुर्गला रवाना झाले. ते परतेपर्यंत डॉ. आरती घोरपडे यांच्याकडे कार्यभार देण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या परीक्षणासाठी दिल्ली येथील समिती येण्याच्या पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोना संपल्यानंतर यातील काही जणांना तिकडे हजर व्हावे लागेल असे मानले जाते.