तलाठी उपाध्ये यांची इंगळी येथेच नियुक्ती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:22 AM2021-04-10T04:22:52+5:302021-04-10T04:22:52+5:30
प्रांत कार्यालयात निवेदन लोकमत न्यूज नेटवर्क इंगळी : अवैध माती उत्खननप्रकरणी दंडात्मक कारवाई केल्याच्या द्वेषातून येथील तलाठी संतोष ...
प्रांत कार्यालयात निवेदन
लोकमत न्यूज नेटवर्क
इंगळी : अवैध माती उत्खननप्रकरणी दंडात्मक कारवाई केल्याच्या द्वेषातून येथील तलाठी संतोष उपाध्ये यांना लक्ष्य केले आहे. त्यांच्याबाबत ग्रामस्थांची कोणतीच तक्रार नसल्याने त्यांची पुन्हा इंगळी येथेच नियुक्ती करावी, अशा मागणीचे निवेदन ग्रामस्थांच्या वतीने इचलकरंजी प्रांत कार्यालयात देण्यात आले.
निवेदनात, माती उत्खननासाठी रॉयल्टी भरून परवानगी देण्यासाठी वीटभट्टी चालकांकडून २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना तलाठी उपाध्ये यांना लाचलुचपत विभागाने पकडले होते. संबंधित तक्रारदार हा बाहेरगावचा असून, यापूर्वीच्या प्रकरणात त्याच्यावर दंडात्मक कारवाई केल्याच्या द्वेषातून उपाध्ये यांना लक्ष्य केले आहे. तलाठी उपाध्ये यांच्या कामाबाबत ग्रामस्थांची कोणतीच तक्रार नाही. त्यांना पुन्हा नियुक्त करावे, असे म्हटले आहे. शिष्टमंडळात सरपंच रावसाहेब पाटील, बाबूराव पाटील, शांतीनाथ चौगुले, बाळासाहेब कोळी, चेतन चौगुले आदींचा समावेश होता.