तलाठी व ग्रामसेवक यांनी गावचे जिल्हाधिकारी म्हणून काम करावे : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2020 03:28 PM2020-09-22T15:28:55+5:302020-09-22T15:30:19+5:30

कोल्हापूर : तलाठी व ग्रामसेवक यांनी आप-आपल्या गावचे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज करावे. गावात रुग्ण वाढणार नाही यासाठी ग्राम समित्यांना ...

Talathis and Gramsevaks should work as village collectors: Daulat Desai | तलाठी व ग्रामसेवक यांनी गावचे जिल्हाधिकारी म्हणून काम करावे : दौलत देसाई

तलाठी व ग्रामसेवक यांनी गावचे जिल्हाधिकारी म्हणून काम करावे : दौलत देसाई

googlenewsNext
ठळक मुद्देतलाठी व ग्रामसेवक यांनी गावचे जिल्हाधिकारी म्हणून काम करावे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले निर्देश

कोल्हापूर : तलाठी व ग्रामसेवक यांनी आप-आपल्या गावचे जिल्हाधिकारी म्हणून कामकाज करावे. गावात रुग्ण वाढणार नाही यासाठी ग्राम समित्यांना सक्रीय करुन नियोजन करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी  दिले.

जिल्हाधिकारी देसाई यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व उपविभागीय अधिकारी, तहसिलदार, गट विकास अधिकारी, नगरपालिकांचे मुख्याधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांच्याशी आज संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, निवासी उप जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, डॉ. उषादेवी कुंभार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे समन्वयक संजय शिंदे उपस्थित होते.

ते म्हणाले, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेतंर्गत मोठ्या प्रमाणात सर्व्हेक्षण करुन त्याची माहिती भरावी. रुग्णांचे स्वॅब घेवून अँन्टीजेन टेस्ट करावी. सर्व्हेक्षणाचे काम नाकारणाऱ्यांवर कारवाई करा. तहसिलदार, गट विकास अधिकारी यांनीही सर्व्हेक्षण बरोबर होत की नाही याची गावात भेट देवून पाहणी करावी. प्रतिबंधक क्षेत्रात अंमलबजावणी करावी. तलाठी, ग्रामसेवक यांनी गाव न सोडता सक्रीयपणे काम करावे. अजिबात शिथिलता येवू देवू नका. मास्क नाही तर प्रवेश नाही, मास्क नाही तर वस्तुही नाहीत याचे फलक प्रत्येक आस्थापनाच्या दर्शनी भागात लावून या मोहिमेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. असे सांगून जिल्हाधिकारी श्री. देसाई म्हणाले, महापालिका, नगरपालिका क्षेत्रात या मोहिमेचे उल्लंघन करणारी दुकाने आठवडा भरासाठी सील करावीत. फेरीवाल्यांवरही कारवाई करावी.
मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल म्हणाले, काँटॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा. सर्व्हेक्षणामध्ये इली आणि सारीच्या रुग्णांना शोधून संदर्भीत करावे. नो मास्क नो एंट्रीचे उल्लंघन करणारी दुकाने सील करुन टाका. एचआरसीटी करणाऱ्या लॅबचा ग्रुप तयार करुन त्यावर अहवाल मिळावावा. त्यानुसार स्वॅब तपासणीसाठी पाठपुरावा करावा. त्या संदर्भात लॅबशी पत्रव्यवहार करुन स्वॅब कलेक्शन केंद्र उभे करायलाही सांगा.

आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांनी नियमांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. साळे यांनीही मार्गदर्शन केले.
---

फोटो कोलडेस्क ला कलेक्टर बैठक नावाने पाठवला आहे.
ओळ : जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सोमवारी जिल्ह्यातील अधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल, आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Web Title: Talathis and Gramsevaks should work as village collectors: Daulat Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.