राज्यात लवकरच तलाठी भरती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2017 01:14 AM2017-08-08T01:14:10+5:302017-08-08T01:14:51+5:30

गारगोटी : ग्रामीण भागातील जनतेचा त्रास संपवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना अमलात आणत असून, त्यातील एक भाग म्हणून राज्यात सजांची व मंडल अधिकाºयांची कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत.

 Talati recruitment soon in the state | राज्यात लवकरच तलाठी भरती

राज्यात लवकरच तलाठी भरती

Next
ठळक मुद्दे चंद्रकांतदादा पाटील : गंगापूर येथे चावडी इमारतीचे उद्घाटनतलाठी कार्यालय लवकरात लवकर उभारणी करण्याचा मानसकाही ठिकाणी तलाठी कार्यालये भाड्याच्या खोलीत

गारगोटी : ग्रामीण भागातील जनतेचा त्रास संपवण्यासाठी सरकार विविध उपाययोजना अमलात आणत असून, त्यातील एक भाग म्हणून राज्यात सजांची व मंडल अधिकाºयांची कार्यालये निर्माण करण्यात येणार आहेत. त्यामुळे संगणकीकृत सात-बारे उतारे शेतकºयांना त्वरित मिळतील. तलाठ्यांवरील कामाचा ताण कमी करण्यासाठी चार हजार तलाठी व पाचशे मंडल अधिकाºयांची नव्याने भरती करणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून बांधण्यात आलेल्या मौजे गंगापूर (ता. भुदरगड) येथील चावडी इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आबिटकर होते.यावेळी पाटील म्हणाले, सध्या कार्यरत तलाठयांकडे अनेक सज्ज्यांचा कार्यभार असल्याने त्यांना अनेक गावांना फिरावे लागते. त्यासाठी त्यांना जनतेसाठी पटकन उपलब्ध होणे शक्य नसल्याने कामात अडचणी येत असतात. सरकारने याची दखल घेतली असून येत्या काही दिवसांत विशाल तलाठी भरती करणार आहे.

या भरतीमुळे महसूल खात्यात मनुष्यबळ वाढून तलाठी मंडळींवरील कामाचा ताण कमी करून त्यांच्याकडे काम करण्यासाठी मोजकीच गावे देण्याचे नियोजन आहे. त्यामुळे तलाठी जनतेच्या कामासाठी पटकन उपलब्ध होऊ शकेल आणि उतारेदेखील पटकन मिळतील. यासाठी तलाठी कार्यालय लवकरात लवकर उभारणी करण्याचा मानस आहे.

आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, भुदरगड, आजरा, राधानगरी या तीन तालुक्यांतील अनेक गावांमध्ये तलाठी कार्यालये असूनदेखील इमारती जीर्ण झाल्या आहेत, तर काही ठिकाणी तलाठी कार्यालये भाड्याच्या खोलीत आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी द्यावा, त्याचबरोबर भुदरगड तालुक्यातील अनेक गावांतील रस्त्यांची समस्या आणि त्यांची स्थिती फारच चिंताजनक आहे. त्यामुळे विशेष निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंतीही त्यांनी केली.

यावेळी स्वागत व प्रास्ताविक प्रांताधिकारी डॉ. संपत खिलारी यांनी केले. कार्यकारी अभियंता एन. एम. पाठक, गटविकास अधिकारी माधुरी परीट, भाजप जिल्हा सरचिटणीस प्रवीणसिंह सावंत, जिल्हा परिषद सदस्य रेश्मा देसाई, सभापती सरिता वरंडेकर, ‘गोकुळ’चे संचालक बाबा देसाई, पंचायत समिती सदस्य संग्राम देसाई, सरपंच संगीता केणे, भाजप तालुकाध्यक्ष नाथाजी पाटील, पंडितराव केणे, माजी जिल्हा परिषद सदस्य राहुल देसाई, जि.प.चे माजी उपाध्यक्ष बी. एस. देसाई, भाजप जिल्हा उपाध्यक्ष प्राचार्य धनाजी मोरुसकर, मौनी विद्यापीठ शासकीय प्रतिनिधी अलकेश कांदळकर, नायब तहसीलदार व्ही. एन. बुट्टे, निवासी नायब तहसीलदार शीतल देसाई, जिल्हा माहिती अधिकारी वर्षापाटोळे, ग्रामपंचायत सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, उपस्थित होते. उपस्थितांचे आभार तहसीलदार अमरदीप वाकडे यांनी मानले.

नशीबवान चावडी
गंगापूरसारख्या खेडेगावातील एका सामान्य चावडीचे उद्घाटन महसूलमंत्र्यांच्या हस्ते होण्याचा मान या चावडीला मिळाला. राज्यातील ही एकमेव नशीबवान चावडी असावी, असे आबिटकर म्हणाले.

Web Title:  Talati recruitment soon in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.