तळेगाव ठाकुरात ‘बाटली झाली आडवी’

By Admin | Published: June 15, 2017 12:07 AM2017-06-15T00:07:21+5:302017-06-15T00:07:21+5:30

तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर येथे देशी दारू विक्रीचे दुकान बंद करण्यासाठी महिलांनी केलेल्या आंदोलनाला यश मिळाले आहे.

Talegaon Thakur 'bottle was hoarse' | तळेगाव ठाकुरात ‘बाटली झाली आडवी’

तळेगाव ठाकुरात ‘बाटली झाली आडवी’

googlenewsNext


लोकमत न्यूज नेटवर्क
भोगावती : राधानगरी-भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत हात या चिन्हावर निवडणूक लढवावी. काँग्रेस पक्षात त्यांचे स्वागत करू आणि त्यांनाच उमेदवारी दिली जाईल, त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा, असे आग्रहाचे निमंत्रण जिल्हा काँग्रेसचे व भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी आमदार आबिटकर यांना
दिले.
कौलव (ता. राधानगरी) येथे स्व. बाळासाहेब पाटील-कौलवकर यांच्या २६व्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित अध्यक्षपदावरून पाटील बोलत होते. यावेळी भोगावती कारखान्याच्या सर्व संचालकांचा, नूतन जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
पाटील पुढे म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यातील काँग्रेस बळकट करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. आबिटकर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून मुख्यमंत्री स्वत:हून काही न बोलता चंद्रकांत पाटील यांच्याकडून बोलवून घेत आहेत. कर्जमाफी देत असताना सरसकट देणे, तत्त्वत: देणे अशी वर्गवारी करून सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे, असा आरोप पाटील यांनी केला. स्व. बाळासाहेब पाटील कौलवकर यांना स्व. यशवंतराव चव्हाण यांचा राजकीय सामाजिक वारसा लाभला होता. त्याच तत्त्वाचे राजकारण करण्याची गरज निर्माण झाली आहे, असे मत पाटील यांनी व्यक्त केले.
आमदार आबिटकर यावेळी म्हणाले, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा आवाज विधानसभेत उठवला तसेच मुख्यमंत्र्यांना प्रत्यक्षात भेटून सरसकट कर्जमाफीची मागणी केली. आपल्या प्रश्नांसाठी शेतकऱ्यांनी एक होण्याची गरज आहे. स्व. बाळासाहेब पाटील यांचे विचार आजच्या राजकारणाला मार्गदर्शक ठरणारे आहेत. कारखाना उपाध्यक्ष उदयसिंह पाटील कौलवकर, रविश पाटील कौलवकर यांनी मनोगत व्यक्त केले.
स्व. बाळासाहेब पाटील-कौलवकर यांच्या फोटोचे पूजन पी. एन. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शैक्षणिक, क्रीडा, कृषी, सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या मान्यवरांचा बाळासाहेब पाटील-कौलवकर स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला ‘गोकुळ’चे ज्येष्ठ संचालक पी. डी. धुंदरे, सत्यजित पाटील, बाळासाहेब खाडे, उदय पाटील, कृष्णराव किरुळकर, जिल्हा बँकेच्या संचालिका उदयनी साळोखे, विजयसिंह मोरे, अरुण जाधव, अभिजित तायशेटे, संजयसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, दत्तात्रय उगले, एम. आर. पाटील, माणिकराव चव्हाण, जि. प. सदस्य पांडुरंग भांदिगरे, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कौलव येथे स्व. बाळासाहेब पाटील-कौलवकर यांच्या २६ व्या स्मृतीदिनानिमित्त सत्कार आणि पारितोषिक वितरण कार्यक्रमात माजी आमदार पी. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कृष्णराव किरुळकर, आमदार प्रकाश आबिटकर, अरुण डोंगळे, उदयसिंह पाटील, आदी उपस्थित होते.

Web Title: Talegaon Thakur 'bottle was hoarse'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.