जिल्हा परिषद विभागप्रमुखांकडे तालुक्यांची जबाबदारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 04:10 AM2021-05-04T04:10:59+5:302021-05-04T04:10:59+5:30
कोल्हापूर : कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी ...
कोल्हापूर : कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत असल्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी बारा तालुक्यांसाठी संपर्क अधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
तालुक्यातील गटविकास अधिकाऱ्यांकडून एकीकडे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसह अन्य जबाबदाऱ्या पार पाडल्या जात असताना, त्यांच्यावर अतिरिक्त कामाचा बोजा पडत आहे. त्यामुळे रुग्णांची माहिती अपलोड करण्यापासून ते कॉन्टॅक्ट ट्रेसिंग केल्यानंतर संपर्कातील नातेवाईक व अन्य नागरिकांना तपासण्यासाठी आणण्यापर्यंत काही बाबतीत विलंब होत आहे. यासाठी समन्वयासाठी म्हणून या विभागप्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे.
प्रियदर्शिनी मोरे- पन्हाळा, विजय कांडगावे- हातकणंगले, अरुण जाधव- शाहूवाडी, आशा उबाळे- राधानगरी, मनीष पवार- गडहिंग्लज, किरण लोहार- शिरोळ, संजय राजमाने- करवीर, मनीषा देसाई- कागल, सोमनाथ रसाळ- आजरा, दीपक घाटे- गगनबावडा, विनोद पवार- भुदरगड आणि चंद्रकांत सूर्यवंशी- चंदगड या अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. रवी शिवदास यांची गेल्यावर्षीपासूनच शेंंडा पार्क येथील शासकीय प्रयोगशाळेकडे समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्व अधिकाऱ्यांना कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर भर देण्यास सांगण्यात आले आहे.
चौकट
संपर्क अधिकाऱ्यांची कामे...
१ पाॅझिटिव्ह रुग्णांची माहिती तालुकापातळीवरून गावपातळीवर कळवली जाते का?
२ हाय रिस्क व्यक्तींची यादी त्याचदिवशी गावपातळीवर निश्चित होते का व त्याचदिवशी त्यांचा स्वॅब घेतला जातो का?
३ कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती राेज पोर्टलवर भरली जाते का , व त्याचा अहवाल जिल्हा स्तरावर रोजच्या रोज पाठवला जातो का? हे पाहणे.