बाचणीत मुश्रीफ गटाच्या १५ वर्षाच्या सत्तेला सुरूंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2017 07:47 PM2017-10-19T19:47:15+5:302017-10-19T19:50:01+5:30

बाचणी : बाचणी (ता. कागल) ग्रामपंचायत निवडणूकीत सत्ताधारी मुश्रीफ गटाचा 9 विरूद्ध 2 अशा बहूमतासह सरपंचपदाला गवसणी घालत माद्लिक-बाबा-राजे या महायुतीने धुव्वा उडविला.

Tanging to the power of the 15-year-old Tawat-i-Mushrif group | बाचणीत मुश्रीफ गटाच्या १५ वर्षाच्या सत्तेला सुरूंग

बाचणीत मुश्रीफ गटाच्या १५ वर्षाच्या सत्तेला सुरूंग

Next
ठळक मुद्दे मंडलिक गटाचे निवास पाटील सरंपचगेल्या पाच वर्षाच्या तीव्र रोषाच्या राजकारणामुळे असंवेदनशील प्रथमच गावाचा समावेश संवेदनशील गावांच्या यादीत

बाचणी : बाचणी (ता. कागल) ग्रामपंचायत निवडणूकीत सत्ताधारी मुश्रीफ गटाचा 9 विरूद्ध 2 अशा बहूमतासह सरपंचपदाला गवसणी घालत माद्लिक-बाबा-राजे या महायुतीने धुव्वा उडविला. सरपंच पदाच्या निमित्ताने स्थानिक राजकारणात प्रथमच सक्रिय झालेले निवास पाटील यांनी इकबाल नायकवडी यांचा पराभव केला. तर विद्यमान सरपंच व मुश्रीफ गटाचे कट्टर समर्थक सुर्यकांत पाटील यांचा राजे गटाचे विद्यमान सदस्य उत्तम पाटील यांनी पराभव केला.

गेल्या पाच वर्षाच्या तीव्र रोषाच्या राजकारणामुळे असंवेदनशील प्रथमच गावाचा समावेश संवेदनशील गावांच्या यादीत झाल्याने प्रशासनासह पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. त्यामुळे दरवर्षी मतदानात होणारी अरेरावी व मतदान केंद्रातील हस्तक्षेपही थंडावला होता. निवडणूकीत मुश्रीफ गट विरोधात मंडलिक-बाबा-राजे आघाडीची लढत झाली. प्रचंड इषेर्ने ९४ टक्के मतदान झाले होते.

आज जाहीर झालेल्या निकालानुसार प्रभाग क्र. ०१ मध्ये सतीश ज्ञानदेव पाटील बाबा गट व पूजा सजेर्राव पाटील मंडलिक गटाच्या दोन्ही उमेदवारांनी महाआघाडीच्या विजयाचा प्रारंभ केला. तर मुश्रीफ गटाने येथे आॅल्टीन डिसोजा याएका जागेवर विजय मिळविला. प्रभाग दोनमध्ये अल्लाबक्ष शहानेदिवाण व सारीका उत्तम चैगले या महाआघाडीच्या उमेदवारांनीच विजय मिळविला.

प्रभाग तीनमध्ये गणपती दादू पाटील व कमल अजित पाटील यांनी महाआघाडीच्या बहूमतावर शिक्का मोर्तब केला तर मुश्रीफ गटाने येथे जयश्री गुरव या दुस?्या उमेदवार विजयी झाल्या. सर्वांचे लक्ष लागून असलेल्या प्रभाग ४ मध्ये विद्यमान सरपंच सुर्यकांत पाटील व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य उत्तम पाटील यांनी ८० मतांच्या फरकाने विजय मिळवित राजे गटासह महाआघाडीची प्रतिष्ठा जपली. तर माजी सरपंच मारूती कांबळे यांचाही महाआघाडीचे उमेदवार रमेश कांबळे यांनी अनपेक्षीतरित्या ८ मतांनी पराभव केला. तर वनिता कुंभार यांनीही महादेवी पाटील यांच्यावर मात केली.

सरपंच पदासाठी महाआघाडीतून मंडलिक गटामार्फत निवास पाटील तर मुश्रीफ गटामार्फत इकबाल नायकवडी रिंगणात होते. यामध्ये प्रत्येक प्रभागात टोकाचा प्रचार झाल्याने निकालाबाबत उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत होत्या. यामध्ये निवास पाटील यांना १२९९ तर इकबाल नायकवडी यांना ११२९ इतकी मते मिळाली. जवळपास १७० मतांनी पाटील यांनी नायकवडी यांच्यावर विजय मिळविला.

पुतण्याकडून चुलत्याचा पराभव
प्रभाग क्र ४ मध्ये रमेश कांबळे व माजी सरपंच मारूती कांबळे या पुतण्या-चुलत्यात लढत झाली होती. सुमारे ३५ वर्षाच्या राजकारणाचा अनुभवाच्या जोरावर मारूती कांबळे विजय होतील अशी शक्यता होती. पण स्वच्छ प्रतिमा, युवा नेतृत्व व सुस्वभावी वृत्ती यामुळे रमेश कांबळे यांनी 8 मतांनी विजय मिळविला. तर याच प्रभागात स्वत:च्या वाहिनीला विरोधात उभा करणा?्या विद्यमान सरपंच सुर्यकांत पाटील यांचा पराभव करत उत्तम पाटील यांनी बाजी मारली.

 

Web Title: Tanging to the power of the 15-year-old Tawat-i-Mushrif group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.