जयसिंगपूरच्या विकासासाठी ‘ताराराणी’ कटिबद्ध : माने

By admin | Published: December 27, 2016 11:53 PM2016-12-27T23:53:36+5:302016-12-27T23:53:36+5:30

नगराध्यक्षासह ताराराणीच्या नगरसेवकांचे पदग्रहण

'Tararani' committed for the development of Jaisingpur: Mane | जयसिंगपूरच्या विकासासाठी ‘ताराराणी’ कटिबद्ध : माने

जयसिंगपूरच्या विकासासाठी ‘ताराराणी’ कटिबद्ध : माने

Next

जयसिंगपूर : पारदर्शी व लोकाभिमुख कारभार करण्यासाठी विकासकामांचा आराखडा तयार करुन पाणीप्रश्नाबरोबरच भुयारी गटर योजना, झोपडपट्टीवासीयांचा प्रश्न सोडविण्याबाबत ताराराणी आघाडी कटिबद्ध राहील, जनता दरबाराच्या माध्यमातून प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही नगराध्यक्ष डॉ. नीता माने यांनी दिली.
ताराराणी आघाडीच्या नगराध्यक्ष व नगरसेवक यांनी सोमवारी पालिकेचा पदभार स्वीकारला. यावेळी नगराध्यक्ष माने बोलत
होत्या. पदभार स्वीकारल्यानंतर यावेळी मुख्याधिकारी हेमंत निकम यांनी नगराध्यक्ष माने यांचे स्वागत केले.
पालिकेच्या छत्रपती राजर्षी शाहू महाराज खुले नाट्यगृहात नूतन नगराध्यक्ष व नगरसेवक यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. स्वागत पक्षप्रतोद बजरंग खामकर यांनी केले. प्रास्ताविक नगरसेवक सर्जेराव पवार यांनी केले. त्यानंतर पालिका निवडणुकीत ताराराणी आघाडीकडून लढलेल्या उमेदवारांबरोबरच नूतन नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.
नगरसेविका सोनाली मगदूम,
डॉ. महावीर अक्कोळे, भाजपचे मंडलाध्यक्ष मिलिंद भिडे, नगरसेवक पराग पाटील, जि. प. सदस्य सावकर मादनाईक, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनिल यादव, फारुख पठाण, शंकर बिराजदार यांनी मनोगते व्यक्त केली.
यावेळी आमदार उल्हास पाटील, विठ्ठलराव नाईक-निंबाळकर, दलितमित्र अशोकराव माने, डॉ. श्रीवर्धन पाटील, धनाजीराव जगदाळे, मिलिंद साखरपे, भरत बागरेचा, शीतल गतारे, चंद्रकांत जाधव,
विनोद चोरडिया यांच्यासह ताराराणी आघाडीचे नगरसेवक, नागरिक उपस्थित होते. सूत्रसंचालन शैलेश आडके यांनी केले. नगरसेवक शैलेश चौगुले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


या प्रश्नांना प्राधान्य
पालिकेची आर्थिक स्थिती सध्या काय आहे, याची माहिती जनतेला समजावी. यासाठी श्वेतपत्रिका काढली जाणार असून, प्रलंबित असणारा शिवाजी महाराजांचा पुतळा, पालिका शाळांचा दर्जा, सांडपाण्याचे नियोजन, झोपडपट्टीसाठी पायलट योजना, नागरिकांच्या तक्रारीचे निवारण होण्यासाठी मोबाईल अ‍ॅपची सुविधा, सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची सोय याचबरोबर अनेक विकासात्मक धोरणे राबविली जाणार असल्याचे नगराध्यक्ष माने यांनी सांगितले.

Web Title: 'Tararani' committed for the development of Jaisingpur: Mane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.