ताराराणी ते दसरा चौक रस्ता महिलांसाठी

By admin | Published: October 10, 2016 12:53 AM2016-10-10T00:53:24+5:302016-10-10T00:53:24+5:30

प्रदीप देशपांडे : नऊ मार्गांचा नकाशा प्रसिद्ध; पार्किंगचेही त्या-त्या परिसरात नियोजन

From Tararani to Dasara Chowk road women | ताराराणी ते दसरा चौक रस्ता महिलांसाठी

ताराराणी ते दसरा चौक रस्ता महिलांसाठी

Next

कोल्हापूर : मराठा क्रांती मूक मोर्चासाठी येणाऱ्या नागरिकांना साडेतीन किलोमीटरपेक्षा जास्त चालावे लागू नये, याची दक्षता पोलिस प्रशासनाने घेतली असून, दिशांनिहाय नऊ ठिकाणी पार्किंगचे नियोजन केले आहे. जिल्ह्यातील येणारे नागरिक ताराराणी चौक, दसरा चौक; तर शहरातील नागरिक गांधी मैदान येथे एकत्रित येणार आहेत. ताराराणी चौक ते दसरा चौक हा मार्ग मोर्चातील महिलांसाठी राखीव ठेवल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली.
महामार्गावरील वाहतुकीला अडथळा होणार नाही, अशा प्रकारे पार्किंगचे नियोजन केले आहे. शिरोली नाका, उचगाव, सरनोबतवाडी, शाहू नाका, कळंबा नाका, पुईखडी, फुलेवाडी, शिवाजी पूल, शिये नाका या मार्गांवरून नागरिक ताराराणी चौकात मोर्चात सहभागी होतील. या मार्गांवरील वाहनांचे पार्किंग त्याच परिसरात केले आहे. दसरा चौकात सर्व एकत्रित येणार असल्याने येथून चारीही दिशांना किमान दोन किलोमीटरच्या रांगा राहणार आहेत. त्या दृष्टीने पोलिस यंत्रणेने नियोजन केले आहे. एका पार्किंग स्टेशनला एक अधिकारी, तीन वाहतूक कर्मचारी व चार कॉन्स्टेबल तैनात करणार आहेत. मोर्चाच्या मार्गावर तीस ठिकाणी वॉच टॉवर उभारणार आहेत. ठिकठिकाणी स्क्रीन लावणार आहेत. ‘एफएम’वरून मोर्चाची माहिती तातडीने पुरवली जाणार असल्याचे पोलिस अधीक्षक देशपांडे यांनी सांगितले.
यावेळी अतिरिक्त पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, पोलिस उपअधीक्षक (गृह) सतीश माने, शहर पोलिस उपअधीक्षक भारतकुमार राणे, वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, प्रशांत क्षीरसागर, राजू लिंग्रज, आदी उपस्थित होते.
शिरोली नाका ते ताराराणी चौक : सांगली, मिरज, शिरोळ, जयसिंगपूर : रुईकर कॉलनी मैदान व परिसर, मार्केट यार्ड पाठीमागील रेल्वे गुड्स यार्ड, मुक्त सैनिक वसाहत परिसर, मुस्कान लॉन, रामकृष्ण लॉन.
उचगाव ते ताराराणी चौक : कुुरुंदवाड, अब्दुललाट, इचलकरंजी, हुपरी, रेंदाळ, खिद्रापूर, घोसरवाड, पट्टणकोडोली, मुडशिंगी, कर्नाटक सीमाभाग, सदलगा : विक्रमनगर, आय.आर.बी. हॉटेल मैदान, धान्यबाजार, जनावरांचा बाजार, उर्दू शाळा, महापालिका शाळा, घाटगे-पाटील इंडस्ट्रीज परिसर.
सरनोबतवाडी ते ताराराणी चौक : गांधीनगर, वळिवडे, इचलकरंजी, उचगाव रोडवरून येणारी जादा वाहने : युको बॅँकेमागील पटांगण, राजाराम तलाव परिसर जागा, राजाराम तलावालगतच्या टॉवरशेजारील पटांगण, एच.पी. गॅस गोडावून परिसर, सरनोबतवाडी.
शाहू नाका ते ताराराणी चौक : चंदगड, आजरा, कागल, निपाणी, संकेश्वर, गडहिंग्लज, बेळगाव व सीमाभाग, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, कणेरी, कंदलगाव, गिरगाव, कोगिल : गव्हर्न्मेंट पॉलिटेक्निक कॉलेज मैदान, राजाराम कॉलेज मैदान, शिवाजी विद्यापीठ परिसर, नॅनो टेक्नॉलॉजी मैदान, सिंथेटिक ट्रॅक मैदान, शांतिनिकेतन हायस्कूल मैदान, कृषी खाते मैदान, शेंडापार्क.
कळंबा नाका ते दसरा चौक : कळंबा, गारगोटी, बिद्री, चंदगड, मुदाळ तिट्टा, राधानगरी, करवीर, मुरगूड, कावणे, निगवे खालसा, शेळेवाडी, भुदरगड : शेंडा पार्क ते सायबर चौक मार्गावरील एक बाजू, कृषी मैदान शेंडा पार्क, तपोवन मैदान.
पुईखडी ते दसरा चौक : राधानगरी, वाशी, सडोली, परिते, घोटवडे, तारळे, कौलव, हळदी, कांडगाव, हसूर, करवीर : कृषी मैदान, शेंडा पार्क, तपोवन मैदान.
फुलेवाडी ते दसरा चौक : बालिंगा, दोनवडे, कळे, भामटे, बाजारभोगाव, बोरबेट, कोदे, कुडित्रे, खुपिरे, सांगरूळ, गगनबावडा, साळवण, धुंदवडे : तपोवन मैदान, दत्तमंदिर फुलेवाडी मैदान, फुलेवाडी अंतर्गत रोड, पी. एन. पाटील गॅरेज ते बोंद्रेनगर रिंगरोड.
शिवाजी पूल ते दसरा चौक : पन्हाळा, शाहूवाडी, आंबेवाडी, आसुर्ले-पोर्ले, केर्ली, मलकापूर, बांबवडे, सरुड, पिशवी, साळशी : पाटील समाधी परिसर, जयहिंद धाबा, पाटील पेट्रोल पंप, सोनतळी मैदान.
शिये नाका ते दसरा चौक : शिये, अंबप, वाठार, किणी, वडगाव, वारणानगर, कोडोली, पारगाव, तळसंदे , सावर्डे, टोप, खोची, लाटवडे, संभापूर, हातकणंगले, कऱ्हाड, सातारा, इस्लामपूर : कसबा बावडा पॅव्हेलियन मैदान, संग्राम पाटील लेआउट, ताराराणी चौक, गोळीबार मैदान, राजाराम कारखाना वाहनतळ.
शिरोली नाका ते ताराराणी चौक : सांगली, मिरज, शिरोळ, जयसिंगपूर : रुईकर कॉलनी मैदान व परिसर, मार्केट यार्ड पाठीमागील रेल्वे गुड्स यार्ड, मुक्त सैनिक वसाहत परिसर, मुस्कान लॉन, रामकृष्ण लॉन.
उचगाव ते ताराराणी चौक : कुुरुंदवाड, अब्दुललाट, इचलकरंजी, हुपरी, रेंदाळ, खिद्रापूर, घोसरवाड, पट्टणकोडोली, मुडशिंगी, कर्नाटक सीमाभाग, सदलगा : विक्रमनगर, आय.आर.बी. हॉटेल मैदान, धान्यबाजार, जनावरांचा बाजार, उर्दू शाळा, महापालिका शाळा, घाटगे-पाटील इंडस्ट्रीज परिसर.
सरनोबतवाडी ते ताराराणी चौक : गांधीनगर, वळिवडे, इचलकरंजी, उचगाव रोडवरून येणारी जादा वाहने : युको बॅँकेमागील पटांगण, राजाराम तलाव परिसर जागा, राजाराम तलावालगतच्या टॉवरशेजारील पटांगण, एच.पी. गॅस गोडावून परिसर, सरनोबतवाडी.
शाहू नाका ते ताराराणी चौक : चंदगड, आजरा, कागल, निपाणी, संकेश्वर, गडहिंग्लज, बेळगाव व सीमाभाग, नेर्ली, तामगाव, गोकुळ शिरगाव, कणेरीवाडी, कणेरी, कंदलगाव, गिरगाव, कोगिल :

Web Title: From Tararani to Dasara Chowk road women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.