‘ताराराणी’ भविष्यात बहुमतासाठी आमच्यासोबत

By admin | Published: December 26, 2016 12:19 AM2016-12-26T00:19:02+5:302016-12-26T00:19:02+5:30

पी. एन. पाटील : जिल्हा परिषदेला पक्षांना नव्हे, तर स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊ

'Tararani' will be with us for the future | ‘ताराराणी’ भविष्यात बहुमतासाठी आमच्यासोबत

‘ताराराणी’ भविष्यात बहुमतासाठी आमच्यासोबत

Next

कोल्हापूर : ताराराणी आघाडी पूर्वी काँग्रेस सोबत होती, आता भाजपबरोबर असली तरी उद्या जिल्हा परिषदेत बहुमतासाठी आमच्या सोबतही असेल, असे सूचक वक्तव्य काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत केले. जिल्हा परिषद निवडणुकीत कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर आघाडी करण्याचा प्रश्नच येत नाही, पण काही ठिकाणी स्थानिक आघाड्यांना सोबत घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका काँग्रेस ताकदीने लढविणार आहे. प्रत्येक तालुकानिहाय बैठका घेऊन तयारी सुरू केली आहे. चंदगडमध्ये माजी राज्यमंत्री भरमूण्णा पाटील व ‘गोकुळ’चे संचालक राजेश पाटील हे एकत्र राहणार आहेत. भुदरगड, हातकणंगले, करवीरमध्ये बैठका घेतल्या आहेत. प्रदेश काँग्रेसने गुरुवारी (दि. २९) बैठक बोलावली आहे, त्यावेळी आघाडीबाबत संकेत मिळतील, असे पी. एन. पाटील यांनी सांगितले. भाजपला काही न करता सांगण्याची सवय असल्याने त्यांचा जिल्हा परिषद निवडणुकीबाबत हवा निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे, पण त्यांना उमेदवार आयातच करावे लागतील. राष्ट्रवादीच्या जन्मापासून जिल्हा परिषद निवडणुकीत आघाडी केली नसल्याने आताही स्वबळावरच सामोरे जाण्याची तयारी आम्ही केली आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना गेले दहा वर्षे आमच्यासोबत आहे, असेही ते म्हणाले.

उद्या बंटी-महाडिक एकत्र येतील?
पूर्वी महादेवराव महाडिक, सतेज पाटील, मालोजीराजे छत्रपती यांची ताराराणी आघाडी होती, त्यावेळी आम्हीच बाजूला होतो. राजकारणात कोण-कोणाचा कायमचा शत्रू व मित्रही नसतो, त्यामुळे उद्या सतेज पाटील व महाडिक एकत्र असतील आणि आम्हीच बाहेर जाऊ, असा टोला पी. एन. पाटील यांनी लगावला.
आमची अवस्थाही राष्ट्रवादीसारखीच
विनय कोरे भाजपसोबत गेल्याने राष्ट्रवादीला पन्हाळ्यात उमेदवार शोधावे लागतील. कागलमध्ये गेल्यावेळी संजय मंडलिक व संजय घाटगे आमच्यासोबत होते, आता ते इतर पक्षात गेल्याने तिथेही राष्ट्रवादीसारखीच आमची अवस्था झाल्याची कबुली पाटील यांनी दिली.
आमचे इकडे-तिकडे नसते : माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कोल्हापूर दौऱ्यावेळी सतेज पाटील यांच्यासह त्यांच्या गटाचे कार्यकर्ते उपस्थित नसल्याचे निदर्शनास आणून दिले असता, कार्यक्रम करवीर मतदारसंघात होता, त्यामुळे कदाचित ते आले नसतील. आम्ही एकमेकांच्या मतदारसंघात जात नसल्याचे स्पष्टीकरण पी. एन. पाटील यांनी दिले.
राजेंद्र सूर्यवंशी काँग्रेसमध्ये येणार!
शेतकरी कामगार पक्षाचे पंचायत समिती सदस्य राजेंद्र सूर्यवंशी हे कार्यकर्त्यांसह कॉँग्रेसमध्ये येणार आहेत. लवकरच मेळावा घेऊन अधिकृत पक्षात दाखल होतील, असे पाटील यांनी सांगितले.

Web Title: 'Tararani' will be with us for the future

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.