आजऱ्यात २१९८३ हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामाचे उद्दिष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:24 AM2021-05-11T04:24:23+5:302021-05-11T04:24:23+5:30
चालूवर्षी पाऊस चांगला होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. ...
चालूवर्षी पाऊस चांगला होणार असल्याचा हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे सध्या तालुक्यात पेरणीपूर्व मशागतीच्या कामांना वेग आला आहे. कोरोनाचे संकट असतानाही शेतकरी राजा शेतामध्ये मशागतीच्या कामात मग्न आहे. बैलांची कमतरता असल्यामुळे यांत्रिक पद्धतीने मशागतीची कामे केली जात आहेत. जमिनीची सुपीकता वाढवून पेरणी योग्य करण्यासाठी सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत शेतकरी शेतातच थांबत आहे.
तालुक्यात भात ९७०० हेक्टर, नाचना ३५०० हेक्टर, ज्वारी ५० हेक्टर, तूर ४० हेक्टर, मूग ५ हेक्टर, उडीद ५ हेक्टर, अन्य कडधान्य ५० हेक्टर, भुईमूग ३२५० हेक्टर, सोयाबीन ८०० हेक्टर, अन्य तेलबिया ५ हेक्टर, ऊस ४५७८ हेक्टर अशी पिके घेतली जातात.
-----------------------
* भात, सोयाबीनची बियाणे विक्रीसाठी बाजारात उपलब्ध
तालुक्यातील शेती सेवा केंद्रामध्ये भात, सोयाबीन, भुईमूग या पिकांची बीजोत्पादन केलेली बियाणे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बियाणे पेरणीपूर्वी घरातच प्रात्यक्षिक करून उगवण क्षमता तपासावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.