टीसीजी युनायटेड बेबी लिग फुटबॉल स्पर्धा : शिवराज स्कूलला दुहेरी विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 6, 2021 11:55 AM2021-04-06T11:55:21+5:302021-04-06T11:56:42+5:30
Football Gadhingalj Kolhapur-गडहिंग्लज येथील गडहिंग्लज युनानटेड फुटबॉल असोसिएशन व टॅलेंन्ट कौन्शिल ग्लोबल (टीसीजी ) फौंडशनतर्फे आयोजित युनायटेड बेबी लिग फुटबॉल स्पर्धेत शिवराज स्कूलने १० व १२ वर्षे वयोगटात दुहेरी विजेतेपद पटकाविले. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १२ संघानी सहभाग घेतला. स्पर्धेचे १३ व वर्ष होते.
गडहिंग्लज : येथील गडहिंग्लज युनानटेड फुटबॉल असोसिएशन व टॅलेंन्ट कौन्शिल ग्लोबल (टीसीजी ) फौंडशनतर्फे आयोजित युनायटेड बेबी लिग फुटबॉल स्पर्धेत शिवराज स्कूलने १० व १२ वर्षे वयोगटात दुहेरी विजेतेपद पटकाविले. एम. आर. हायस्कूलच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेत १२ संघानी सहभाग घेतला. स्पर्धेचे १३ व वर्ष होते.
साधना विद्यालय व गडहिंग्लजला हायस्कूलला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. न्यू होराईझनच्या साई बनगे व शिवराजच्या अथर्व बंग्यानावर यांनी स्पर्धावीरचा बहुमान पटकाविला.
१२ वर्षे गटात एकुण २१ साखळी सामने झाले. शिवराज स्कूलने चार सामने जिंकून तर एक बरोबरीत सोडवून १३ गुणासह अजिंक्यपद पटकाविले.
गडहिंग्लज हायस्कूल व न्यू होरायझन स्कूल यांनी प्रत्येकी ३ सामने जिंकले तर एक बरोबरीत राखत समान दहा गुण मिळविले. गोल सरासरीवर गडहिंग्लज हायस्कूलने बाजी मारून उपविजेतेपद तर साधना हायस्कूल संघाला ८ गुणासह तिसया स्थानावर रहावे लागले.
दहा वर्षाखालील गटात १० सामने झाले. यातही शिवराज स्कूलने तीन सामने जिंकून व एक सामना बरोबरीत ठेवत सर्वाधिक १० गुणासह विजेता ठरला. साधना विद्यालयाने ७ गुणासह उपविजेतेपद तर सर्वोदया स्कूलने ६ गुणासह तृतीय क्रमांक पटकाविला.
दयानंद चौगुले, प्रमोद इंचनाळकर, संजय पाटील यांच्याहस्ते विजेत्या व उपविजेत्या संघांना क्रिडासाहित्य व चषक देवून गौरविण्यात आले.
स्पर्धा समन्वयक ओंकार घुगरी, ओंकार सुतार यांचा सत्कार झाला. यावेळी सुनिल चौगुले, संभाजी शिवारे, प्रसाद गवळी, सूरज तेली, ओंकार जाधव, यासीन नदाफ यांच्यासह खेळाडू, क्रिडाशिक्षक आणि पालक उपस्थित होते. भुपेंद्र कोळी यांनी स्वागत केले. दीपक कुपन्नावर यांनी प्रास्ताविक केले. हुल्लाप्पा सूर्यवंशी यांनी आभार मानले.
स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट
गोलरक्षक - आयन मुल्ला, आदित्य पाटील, बचावपटू - अनमोल तरवाळ , तेजस सावरतकर, मध्यरक्षक- अजिंक्य हातरोटे, ज्ञानेश्र्वर कावडे, आघाडीपटू दर्शन तरवाळ, विनायक गोंधळी