Tea: चहा शिजवा, प्या आणि पावडर पिकांना टाका

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 10:57 AM2023-09-11T10:57:25+5:302023-09-11T10:57:51+5:30

Kolhapur News: चहा शिजवल्यानंतर टाकून देण्यात येणाऱ्या चहापत्तीपासून कार्बन डॉट्स नॅनो संयुग तयार करण्याची प्रक्रिया शिवाजी विद्यापीठाच्या रसायन शास्त्रज्ञांनी यशस्वी करून दाखविली

Tea: Brew tea, drink it and apply the powder to crops | Tea: चहा शिजवा, प्या आणि पावडर पिकांना टाका

Tea: चहा शिजवा, प्या आणि पावडर पिकांना टाका

googlenewsNext

कोल्हापूर : चहा शिजवल्यानंतर टाकून देण्यात येणाऱ्या चहापत्तीपासून कार्बन डॉट्स नॅनो संयुग तयार करण्याची प्रक्रिया शिवाजी विद्यापीठाच्या रसायन शास्त्रज्ञांनी यशस्वी करून दाखविली असून, या संशोधनाला नुकतेच भारतीय पेटंट प्रदान करण्यात आले. हे द्रावण पूर्णतः सेंद्रिय स्वरूपाचे असून पीकवृद्धीसाठी अत्यंत परिणामकारक सिद्ध झाले आहे. 
विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागाचे वरिष्ठ प्राध्यापक गोविंद कोळेकर आणि डॉ. रवींद्र वाघमारे यांनी हे संशोधन केले असून, याचा आता पिकांना फायदा होणार आहे.

फवारणीमुळे वाढ
-संशोधकांनी तयार केलेले कार्बन डॉट्स नॅनो मटेरिअल सोल्युशन पूर्णतः सेंद्रिय असल्याने सर्व प्रकारच्या पिकांसाठी वापरता येते. 
- यामध्ये पाणी धारण करण्याची क्षमता जास्त असल्याने जिरायती शेतीसाठी ते अधिक उपयुक्त ठरू शकते. 
- हे द्रव स्वरूपात असल्यामुळे याची पिकांवर फवारणी केल्यास वाढ अधिक होते.

Web Title: Tea: Brew tea, drink it and apply the powder to crops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.