Lok Sabha Election 2019 जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 12:05 AM2019-04-20T00:05:45+5:302019-04-20T00:06:02+5:30

शिरोळ : देशात जातीच्या नावावर राजकारण सुरू असून, या देशाला पंतप्रधानाची गरज होती. मात्र, सध्याचे पंतप्रधान हे चौकीदार निघाले. ...

Teach a lesson to politicians in the name of caste | Lok Sabha Election 2019 जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा

Lok Sabha Election 2019 जातीच्या नावावर राजकारण करणाऱ्यांना धडा शिकवा

googlenewsNext

शिरोळ : देशात जातीच्या नावावर राजकारण सुरू असून, या देशाला पंतप्रधानाची गरज होती. मात्र, सध्याचे पंतप्रधान हे चौकीदार निघाले. या निवडणुकीला व्यवसाय बनवून ठेवला आहे. गेली पाच वर्षे जातीच्या नावावर समाजामध्ये फूट पाडली जात आहे. विकासाची कोणतीही ठोस व्यवस्था नाही. त्यामुळे ही व्यवस्था बदलण्यासाठी परिवर्तनाची गरज आहे, असे आवाहन सिनेअभिनेते प्रकाश राज यांनी केले.
महाआघाडीचे उमेदवार खासदार राजू शेट्टी यांच्या प्रचारार्थ शिरोळ येथील आझाद मैदानावर आयोजित सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष अमरसिंह पाटील होते. प्रकाश राज पुढे म्हणाले, जे चाळीस वीरजवान देशासाठी शहीद झाले, त्याचे पार्थिव हे ग्रामीण भागाकडे जात होते. त्यामुळे देश चालविणारा व रक्षण करणारा हा ग्रामीण भागातील शेतकरीच आहे. या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी राजू शेट्टी हे रस्त्यावर उतरून आंदोलन करीत आहेत.

त्यामुळे शेतकºयांचा आवाज लोकसभेत उठविण्यासाठी अशा नेतृत्वाची गरज आहे. त्यामुळे त्यांना पुन्हा लोकसभेत पाठवा. मी देखील लोकसभेत असणार आहे, असा विश्वास राज यांनी व्यक्त केला.
यावेळी खासदार राजू शेट्टी म्हणाले, गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारच्या कारभारामुळे हा देश पिछाडीवर गेला असून कृषी, औद्योगिक, अंतर्गत सुरक्षा याचबरोबर आर्थिक संकटात सापडला आहे. सामान्य जनतेला न्याय मिळाला पाहिजे, या भूमिकेतूनच काम केल्यामुळे आजही लोक वर्गणीबरोबर मतेही देत आहेत. दिल्लीहून आदेश निघाला आहे. काहीही करा, पण हातकणंगले मतदारसंघ सोडू नका. मात्र, ही शेतकरी चळवळ आहे. सत्तेचा व पैशांचा गैरवापर करणाºयांना जनताच जागा दाखविणार आहे.
---
————————————————
चौकट - माझीही जबाबदारी : राज
माझी आई नर्स होती. तिने मला घडविलं. या फिल्म इंडस्ट्रिजमध्ये आल्यानंतर माझ्याकडे १२० रुपये होते. आज माझ्याजवळ खूप पैसा आहे. लोकांच्या प्रेमामुळेच मी इतके यश मिळवू शकलो. ज्या लोकांमुळे मी व माझा परिवार आनंदी आहे, त्या लोकांसाठी मला रस्त्यावर उतरावे लागले तरी चालेल. ती माझी जबाबदारी आहे, असे सांगून सिनेअभिनेते राज यांनी सभेला येण्याचा उद्देश विषद केला.


लोकसभेची ही निवडणूक खासदार राजू शेट्टी विरुद्ध नरेंद्र मोदी अशी आहे. माझ्याबद्दल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून खोट्या अफवा पसरविल्या जात असून, मी शेवटपर्यंत राजू शेट्टी यांच्यासोबतच राहणार आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघात मोदींच्या नावावर मते मागितली जात आहेत. त्यामुळे उमेदवाराचे कोणतेच कर्तृत्व नाही, हे सिद्ध होत आहे. जो सरकारच्या विरोधात बोलेल त्याची चौकशी लावण्याचे काम सुरू आहे. सत्ता व पैशांचा भाजप सरकारला माज आला असून, जनताच त्यांना अद्दल घडविल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास रविकांत तुपकर यांनी व्यक्त केला.

Web Title: Teach a lesson to politicians in the name of caste

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.