बदल्यांच्या तक्रारी घेऊन शिक्षक नेते कोल्हापूर जिल्हा परिषदेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2018 01:51 AM2018-05-22T01:51:26+5:302018-05-22T01:51:26+5:30

कोल्हापूर : जिल्ह्यातील साडेतीन हजारहून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या असताना त्यातूनही गैरसोय झालेल्या २००हून अधिक शिक्षकांनी आपल्या संघटनांच्या नेत्यांसह सोमवारी जिल्हा परिषद गाठली.

Teacher Leader in Kolhapur Zilla Parishad | बदल्यांच्या तक्रारी घेऊन शिक्षक नेते कोल्हापूर जिल्हा परिषदेत

बदल्यांच्या तक्रारी घेऊन शिक्षक नेते कोल्हापूर जिल्हा परिषदेत

Next
ठळक मुद्देमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन--२00 हून अधिक शिक्षकांची गर्दी

कोल्हापूर : जिल्ह्यातील साडेतीन हजारहून प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या झाल्या असताना त्यातूनही गैरसोय झालेल्या २००हून अधिक शिक्षकांनी आपल्या संघटनांच्या नेत्यांसह सोमवारी जिल्हा परिषद गाठली. त्यामुळे दिवसभर जिल्हा परिषदेत शिक्षकांचीच गर्दी दिसून येत होती.

चार दिवसांपूर्वी जिल्ह्यातील साडेतीन हजारहून अधिक शिक्षकांची जिल्हातंर्गत बदली झाली आहे. ज्या दिवशी बदलीचा आदेश त्याच्या दुसºया दिवशी हजर राहण्याचे आदेश दिले गेल्याने बहुतांशी शिक्षक बदलीच्या ठिकाणी हजर झाले आहेत.
मात्र, बदली प्रक्रियेतील त्रुटींचा अभ्यास करून कोल्हापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटना समन्वय समितीच्यावतीने सोमवारी शिक्षण सभापती अंबरीश घाटगे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार, प्राथमिक शिक्षणाधिकारी सुभाष चौगुले, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत आडसुळ यांची भेट घेऊन त्यांना निवेदने दिली.

२0१७/१८ च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रथम होणे आवश्यक होते; पण तसे झाले नाही. त्यामुळे मंजूर पदांपेक्षा जास्त शिक्षकांची पदस्थापना अनेक शाळांवर झाली आहे. समानीकरणानंतर रिक्त पदांचा अहवाल प्रसिद्ध होणे क्रमप्राप्त होते, परंतु तसे झाले नाही, प्रत्येक संवर्गाची बदली प्रक्रिया झाल्यानंतर पुढची प्रक्रिया करणे आवश्यक होते. परंतु तसे न झाल्याने पोर्टलवर अंदाजे शाळा भराव्या लागल्या.

पत्नी पत्नी गैरसोयही अनेक ठिकाणी झाली आहे, विषय शिक्षकांच्या सर्व बदल्या न्यायसंगत झालेल्या नाहीत, अशा अनेक त्रुटी समन्वय समितीने काढल्या असून, त्याबाबत विचार करून शिक्षकांना न्याय देण्याची विनंती करण्यात आली..
त्यानुसार ही प्रक्रिया राबविलेल्या ‘निक’ संस्थेकडे या तक्रारी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. खेमनार यांनीही यातील त्रुटी कळवून त्यांच्या निर्देशानुसार पुढची कार्यवाही केली जाणार असल्याचे सांगितले. प्रसाद पाटील, राजाराम वरूटे, सुरेश कोळी, रविकुमार पाटील, मोहन भोसले, संभाजी बापट, सुनील पाटील यांच्यासह शिक्षकांच्या निवेदनावर सह्या आहेत.

अपंग प्रमाणपत्रांची छाननी सुरू
बदली टाळण्यासाठी काही शिक्षकांनी अपंग असल्याचे बोगस प्रमाणपत्र जोडून सवलत मिळविल्याच्या अनेक घटना राज्यात घडल्या आहेत. त्याही कागदपत्रांची छाननी आता गटशिक्षणाधिकाºयांकडून करण्यात येत आहे. याबाबत कुणीतरी तक्रार केल्याशिवाय ही बाब कळत नसल्याने चौकशीतही अडथळे येत आहेत.
 

आणखी काही बदल्या शक्य
२० गावांचे पर्याय देऊनही काही शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नाहीत. त्यांची नावे विस्थापितांच्या यादीत आली आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी पुन्हा पोर्टल खुले करण्यात येणार असून, त्यानंतर ४०० हून अधिक शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Web Title: Teacher Leader in Kolhapur Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.