बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकांची बडतर्फी : दौलत देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 02:10 PM2019-08-01T14:10:35+5:302019-08-01T14:11:35+5:30

शाळेमध्ये शिक्षकांकडून बालकांचे लैंगिक शोषण झालेल्या घटनांची यादी सादर करा. अशा घटनांमधील शिक्षकाला विभागीय चौकशी करून बडतर्फ केले जाईल. त्याचबरोबर अशा घटनांमध्ये शासकीय अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्यास त्याच्या बडतर्फीसाठीही शासनाकडे पाठपुरावा करू, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. करवीर तालुक्यातील वडणगे शाळेत कालच घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी देसाई यांनी आज हे निर्देश दिले.

Teacher who sexually assaults children: Dawlat Desai | बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकांची बडतर्फी : दौलत देसाई

बालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकांची बडतर्फी : दौलत देसाई

googlenewsNext
ठळक मुद्देबालकांचे लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षकांची बडतर्फी : दौलत देसाई जिल्हाधिकारी कार्यालयात चाईल्ड लाईन सल्लागार समितीची बैठक

कोल्हापूर : शाळेमध्ये शिक्षकांकडून बालकांचे लैंगिक शोषण झालेल्या घटनांची यादी सादर करा. अशा घटनांमधील शिक्षकाला विभागीय चौकशी करून बडतर्फ केले जाईल. त्याचबरोबर अशा घटनांमध्ये शासकीय अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्यास त्याच्या बडतर्फीसाठीही शासनाकडे पाठपुरावा करू, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिले. करवीर तालुक्यातील वडणगे शाळेत कालच घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी देसाई यांनी आज हे निर्देश दिले.

चाईल्ड लाईन सल्लागार समितीची बैठक आज जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आली. या बैठकीला महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी हे उपस्थित होते. केंद्र समन्वयक अनुजा खुरंदळ यांनी चाईल्ड लाईन काय करते याविषयी सविस्तर संगणकीय सादरीकरण केले. बालक किंवा बालकांच्या मदतीसाठी 1098 ही हेल्पलाईन आहे.

या हेल्पलाईनवर फोन केल्यास शहरामध्ये असणारी चाईल्ड लाईन टिम 1 तासामध्ये दिलेल्या पत्यावर पोहचते. ही हेल्पलाईन 18 वयोगटापर्यंतच्या मुलांकरिता 24 तास कार्यरत आहे. ऑक्टोबर 2018 ते जुलै 2019 या कालावधीत 22 बालविवाह थांबविण्यात आले आहेत.

जिल्हाधिकारी देसाई यावेळी म्हणाले, पालकांना शिक्षित करणे, त्यांचे जगजागरण करणे हेच बालविवाहावर योग्य उत्तर आहे. शाळेमध्ये घडलेल्या घटनांची विस्तृत माहिती मला द्या. दाखल झालेल्या एफआयआरची प्रत मेलवर मिळावी यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवा. जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर असणाऱ्या जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती तात्काळ द्यावी.

चाईल्ड लाईननी स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन कार्यवाही करावी. ग्रामसेवक,तलाठी यांची मदत घेऊन होणाऱ्या विविध मासिक बैठकांमध्ये त्यांच्यासह पालक यांची काय जबाबदारी आहे, याविषयी माहिती द्यावी. शिक्षण विभाग,उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनीही 1098 चाईल्ड लाईन विषयी जनजागृती करण्यास प्रयत्न करावेत. चाईल्ड लाईनने जनजागृती करणारे फलक तयार करून शाळा, ग्रामपंचायत, शालेय ठिकाणी प्रदर्शित करावेत. त्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन डॉ. कलशेट्टी यांनी दिले.

...आणि तो शिक्षक अखेर बडतर्फच झाला !

पुण्याला मुख्य कार्यकारी असताना बारा वर्षापूर्वी शिक्षकाकडून लैंगिक शोषणाचा गुन्हा घडला होता. त्याच्या प्रकरणामध्ये खऱ्या साक्षीदारांना पुढे आणलं नव्हतं. ज्या साक्षीदारांना पुढे आणलं होतं ते फितुर झाले होते. परिणामी गुन्हेगार निर्दोष सुटला होता. निलंबित असणाऱ्या त्या शिक्षकाला पुन्हा सेवेमध्ये घेण्याबाबतचा प्रस्ताव समोर आला. या प्रकरणाची नव्याने सविस्तर चौकशी करून त्यामध्ये मूळ हस्ताक्षरातील साक्षीदाराचा पुरावा,विविध उच्च न्यायालय यांचे निकाल या सर्वांचा अभ्यास केला. त्या शिक्षकाची विभागीय चौकशी लावून शेवटी त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले, अशी आठवण जिल्हाधिकारी देसाई यांनी आज सांगितली.

या बैठकीला संचालक फादर रोशन, सहाय्यक संचालक फादर लिजो, सुरय्या शिकलगार, बाल कल्याण समितीचे सदस्य के. एस. अंगडी, व्ही. बी. शेटे, वकील गौरी पाटील, सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी प्रसाद गजरे आदी उपस्थित होत.

Web Title: Teacher who sexually assaults children: Dawlat Desai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.