शिक्षक बॅँकेवर ‘पुरोगामी’ची सत्ता आणणारच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2019 12:17 PM2019-11-30T12:17:47+5:302019-11-30T12:19:01+5:30
संचालक मंडळास काटकसरीचे धोरण राबविण्यास भाग पाडल्याने मागील साडेतीन कोटींचा तोटा भरून काढून गेली दोन वर्षे विक्रमी नफा झाला आहे.
कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बॅँकेची आगामी निवडणूक पुरोगामी शिक्षक संघटना ताकदीने लढविणार असून, कोणत्याही परिस्थिती बॅँकेवर सत्ता आणणारच, असा निर्धार संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील यांनी केला.
‘पुरोगामी’ शिक्षक संघटनेच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक कोल्हापुरात झाली. त्यावेळी ते बोलत होते. प्रसाद पाटील म्हणाले, जिल्हा व राज्यस्तरावरील संघटनात्मक कामाच्या जोरावर ‘पुरोगामी’ संघटनेने अल्पावधीतच शिक्षकांमध्ये वेगळे स्थान निर्माण केले आहे. गेली साडेचार वर्षे शिक्षक बॅँकेत आम्ही विरोधक म्हणून सक्षमपणे भूमिका बजावली. कारभारावर सातत्याने अंकुश ठेवल्याने बॅँकेची आर्थिक स्थिती मजबूत झाली. त्यामुळेच सभासदांना लाभांश व कायम ठेवीवरील व्याज देण्यात यश आले. संचालक मंडळास काटकसरीचे धोरण राबविण्यास भाग पाडल्याने मागील साडेतीन कोटींचा तोटा भरून काढून गेली दोन वर्षे विक्रमी नफा झाला आहे.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष एस. के. पाटील, सरचिटणीस शंकर पवार, महिला जिल्हाध्यक्ष गीता कोरवी, सरचिटणीस शारदा वाडकर, अशोक पाटील, दिलीप भोई, अशोक खाडे, के. एस. पाटील, नकुशी देवकर, संध्या महाजन, नंदकुमार आडके, सुनील पोवार, शंकर कुंभार, बाबासो रणसिंग, आनंदराव जाधव, शिवाजी शेटे, प्रभाकर चौगले, सर्जेराव ढेरे, दिगंबर टिपुगडे, पी. आर. पाटील, दत्ता रेपे, प्रमिला माने, अलका थोरात, राजश्री पिंगळे, भारती चोपडे, प्रेरणा चौगुले उपस्थित होत्या.
अन्यथा स्वबळावर रिंगणात!
बॅँकेच्या निवडणुकीत सन्मानपूर्वक युती झाली तर ठीक; अन्यथा स्वबळावर रिंगणात उतरावे, असा आग्रह जिल्हा प्रतिनिधींसह तालुका प्रतिनिधींच्या बैठकीत धरला.