शिक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका -: वडणगेच्या घटनेची गांभीर्याने दखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 12:32 AM2019-08-02T00:32:40+5:302019-08-02T00:33:32+5:30

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील विद्यार्थिनीचे मुख्याध्यापकाकडून झालेल्या शोषणाच्या घटनेची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर ...

Teachers' bracelet for teachers | शिक्षकांना जिल्हाधिकाऱ्यांचा दणका -: वडणगेच्या घटनेची गांभीर्याने दखल

यावेळी संचालक फादर रोशन, साहाय्यक संचालक फादर लिजो, सुरय्या शिकलगार, बालकल्याण समितीचे सदस्य के. एस. अंगडी, व्ही. बी. शेटे, अ‍ॅड. गौरी पाटील, सहाय्यक उपप्रादेशिक अधिकारी प्रसाद गजरे, आदी उपस्थित होते.

Next
ठळक मुद्देकोल्हापूर जिल्ह्यातील घटनांची यादी करण्याचे आदेश

कोल्हापूर : वडणगे (ता. करवीर) येथील विद्यार्थिनीचे मुख्याध्यापकाकडून झालेल्या शोषणाच्या घटनेची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली आहे. या पार्श्वभूमीवर शाळेमध्ये शिक्षकांकडून बालकांचे लैंगिक शोषण झालेल्या घटनांची यादी तयार करून त्यांना बडतर्फ करावे, असे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी गुरुवारी दिले.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित चाईल्ड लाईन सल्लागार समितीच्या बैठकीत ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी प्रमुख उपस्थिती महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, केंद्र समन्वयक अनुजा खरंदळ यांची होती.

बालकांच्या शोषणाच्या घटनांमध्ये शासकीय अधिकारी-कर्मचारी सहभागी असल्यास त्याच्या बडतर्फीसाठीही शासनाकडे पाठपुरावा केला जाईल, असे निर्देश जिल्हाधिकारी देसाई यांनी संबंधित यंत्रणेला येथे दिले. करवीर तालुक्यातील वडणगे शाळेत घडलेल्या विद्यार्थिनीच्या शोषणाच्या घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यात अशा घटनांची यादी तयार करण्याचेही आदेश दिले.
केंद्र समन्वयक खरंदळ यांनी चाईल्ड लाईनसंदर्भात सविस्तर संगणकीय सादरीकरण केले. बालकांच्या मदतीसाठी १०९८ ही हेल्पलाईन आहे.

या हेल्पलाईनवर फोन केल्यास शहरामध्ये असणारी चाईल्ड लाईन टीम १ तासामध्ये दिलेल्या पत्त्यावर पोहोचते. ही हेल्पलाईन १८ वयोगटापर्यंतच्या मुलांकरिता २४ तास कार्यरत आहे. आॅक्टोबर २०१८ ते जुलै २०१९ या कालावधीत २२ बालविवाह थांबविण्यात आले आहेत, असे खरंदळ यांनी सांगितले.

चाईल्ड लाईनने जनजागृती करणारे फलक तयार करून शाळा, ग्रामपंचायत, शालेय ठिकाणी लावावेत; त्यासाठी संपूर्ण सहकार्य केले जाईल, असे आश्वासन डॉ. कलशेट्टी यांनी दिले.
 


वडणगेतील मुख्याध्यापक निलंबित
वडणगे येथील जिल्हा परिषद शाळेतील मुलींशी गैरवर्तनप्रकरणी मुख्याध्यापक बाजीराव पाटील (मूळ गाव आमशी, ता. करवीर) यांना गुरुवारी निलंबित करण्यात आले आहे. प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल यांनी याबाबतचे आदेश काढले. त्यांना शाहूवाडी पंचायत समितीच्या मुख्यालयात हजेरी बंधनकारक करण्यात आली आहे.
करवीरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी शंकर यादव यांच्या फिर्यादीनुसार करवीर पोलीस ठाण्यात ‘पोक्सो’ कायद्यांतर्गत (बाल लैंगिक छळ) पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. याचा अहवाल प्राथमिक शिक्षणाधिकारी आशा उबाळे यांच्याकडे पाठविण्यात आला होता. त्यानुसार अहवाल दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.


शाळेतील घटनांची जिल्हाधिकारी घेणार थेट माहिती
शाळेमध्ये घडलेल्या घटनांची विस्तृत माहिती मला द्या. दाखल फिर्यादीची प्रत मेलवर मिळावी, यासाठी पोलीस अधीक्षकांना पत्र पाठवा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. जिल्हा महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी ग्रामस्तरावर असणाºया जिल्हा बाल संरक्षण कक्षाची माहिती तत्काळ द्यावी. पालकांना शिक्षित करणे, त्यांचे जनजागरण करणे हेच बालविवाहावर योग्य उत्तर आहे.

चाईल्ड लाईनने प्रशासनाला
सोबत घ्यावे
चाईल्ड लाईननी स्थानिक प्रशासनाला सोबत घेऊन कार्यवाही करावी. ग्रामसेवक, तलाठी यांची मदत घेऊन होणाºया विविध मासिक बैठकांमध्ये त्यांच्यासह पालक यांची काय जबाबदारी आहे, याविषयी माहिती द्यावी. शिक्षण विभाग, उपप्रादेशिक परिवहन विभाग यांनीही चाईल्ड लाईनविषयी जनजागृती करण्यास प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले.


कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयात गुरुवारी आयोजित चाईल्ड लाईन सल्लागार समितीच्या बैठकीत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आढावा घेतला. यावेळी अनुजा खरंदळ, डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, आदी उपस्थित होते.


फेरचौकशी करून पुण्यातील शिक्षकाला केले बडतर्फ
पुण्याला मुख्य कार्यकारी अधिकारी असताना १२ वर्षांपूर्वी शिक्षकाकडून लैंगिक शोषणाचा गुन्हा घडला होता. त्याच्या प्रकरणामध्ये खऱ्या साक्षीदारांना पुढे आणले नव्हते. ज्या साक्षीदारांना पुढे आणले ते फितूर झाले होते. परिणामी गुन्हेगार निर्दोष सुटला होता.
निलंबित असणाºया त्या शिक्षकाला पुन्हा सेवेमध्ये घेण्याबाबतचा प्रस्ताव समोर आला. या प्रकरणाची नव्याने सविस्तर चौकशी करून त्यामध्ये मूळ हस्ताक्षरातील साक्षीदाराचा पुरावा, विविध उच्च न्यायालय यांचे निकाल, या सर्वांचा अभ्यास केला. त्या शिक्षकाची विभागीय चौकशी लावून त्याला नोकरीतून काढून टाकण्यात आले, अशी आठवण जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितली.

Web Title: Teachers' bracelet for teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.