शाळेतील झाडांच्या संगोपनासाठी शिक्षकाची सुटीला दांडी!
By admin | Published: June 6, 2017 12:32 AM2017-06-06T00:32:45+5:302017-06-06T00:32:45+5:30
दुष्काळात पाणी देण्याची धडपड : जत तालुक्यातील बाबर वस्ती शाळेतील प्रेरणादायी उपक्रम; पालक, विद्यार्थ्यांचेही सहकार्य - गुड न्यूज
बँकांकडून स्वीकारण्यास नकार : लाखो रुपयांची नाणी पतसंस्थांच्या तिजोरीत
लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : चलनात असलेल्या सुट्या नाण्यांबाबत ग्राहकांच्या मनात संभ्रम कायम असतानाच आता राष्ट्रीयकृत बँकासुद्धा नाणे स्वीकारण्यास नकार देत आहे. त्यामुळे आणखीच संशय निर्माण होत आहे. बँकांच्या या धोरणामुळे सहकारी पतसंस्था अडचणीत आल्या आहेत.
जुन्या चलनी नोटांवर बंदी लादण्यात आल्यानंतर तोपर्यंत चलनात नसलेले १०, ५, २ आणि १ रुपयांची नाणी फार मोठ्या प्रमाणावर चलनात आली ही नाणी शासन बंद करणार असल्याच्या अफवाही या काळात उठल्याने जो तो नाण्यांद्वारेच व्यवहार करू लागला. परिणामी व्यवहारात नाणीच नाणीच दिसू लागली. नागभीड तालुक्यात जवळपास आठ ते दहा सहकारी पतसंस्था आहेत. या पतसंस्थांचे नियमित बचतीच्या माध्यमातून मोठे व्यवहार होत आहेत. या व्यवहारापोटी बचतधारक या पतसंस्थांच्या प्रतिनिधींना नाणीच देत असल्याने या पतसंस्थांकडे नाण्यांचा डोंगर तयार झाले आहेत. या पतसंस्थाचे राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते आणि व्यवहार असले तरी या राष्ट्रीयकृत बँका मात्र या पतसंस्थांकडील नाणी स्वीकारण्यास नकार देत असल्याच्या या तालुक्यातील पतसंस्थांच्या तक्रारी आहेत. येथील स्वामी विवेकानंद ग्रामीण बिगर सहकारी पतसंस्थेकडे जवळपास ८ लाख रुपयांची नाणी जमा झाली आहेत. येथीलच संत आडकुजी महाराज सहकारी पतसंस्थेकडे ३ लाखांची नाणी आहेत. गिरगाव येथील श्रीलक्ष्मी सहकारी पतसंस्थेकडे २ लाख ५० हजारांचे शिक्के जमा आहेत. ही केवळ वाणगीदाखल उदाहरणे झाली. अन्य पतसंस्थांची परिस्थिती अशीच आहे.
या पतसंस्था आता हे शिक्के त्यांचे खाते व व्यवहार असलेल्या राष्ट्रीयकृत बँकाकडे जमा करण्यासाठी जात असतात. तेव्हा हे नाणे स्वीकारण्यास नकार मिळत आहे. कधी गर्दीने, कधी कर्मचारी नसल्याने या नाण्यांची मोजणी करता येत नाही, अशी कारणे त्यांना दिली जात आहेत. यामुळे सहकारी पतसंस्थांची मोठ्या प्रमाणावर कुचंबणा होत आहे.
नाणी बंद झालेली नाही. आमच्याकडेही नाण्यांचा साठा मोठ्या प्रमाणावर झाला आहे. आम्ही ज्याकडे नाणे जमा करतो, त्यांच्याकडेसुद्धा असाच साठा जमा आहे. ते आम्हाला थोडे दिवस थांबण्याचा सल्ला देतात. आम्हीही पतसंस्थांना काही दिवस थांबा असे सांगत आहोत.
- सुरज रोकडे, व्यवस्थापक,
बँक आॅफ इंडिया, नागभीड
आमचा बहुतांश व्यवहारच नाण्यांवर अवलंबून आहे. पण आमच्याकडे आलेली ही नाणी बँका स्वीकारत नसल्याने आमचे व्यवहार ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत.
- संजय गजपुरे, अध्यक्ष, स्वामी विवेकानंद
सह. पतसंस्था, नागभीड
बँका जशा नाणी स्वीकारत नाही तसे आम्हीही स्वीकारणे बंद केले तर अफवा पसरतील व व्यवहारात अराजकता माजेल. शासनाने जाहिरातीद्वारे भूमिका स्पष्ट करावी जेणे करून सामान्य जनतेत संशय निर्माण होणार नाही.
- विनोद बोरकर, अध्यक्ष, श्रीलक्ष्मी सह. पतसंस्था,
गिरगाव (नागभीड)