शिक्षकांनी संघटित होणे गरजेचे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:17 AM2021-07-10T04:17:02+5:302021-07-10T04:17:02+5:30
गडहिंग्लज तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते. यावेळी पुरस्कारप्राप्त व विविध पदांवर निवड झाल्याबद्दल ...
गडहिंग्लज तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे मान्यवरांच्या सत्कारप्रसंगी अध्यक्षपदावरून ते बोलत होते.
यावेळी पुरस्कारप्राप्त व विविध पदांवर निवड झाल्याबद्दल संघटनेचे प्रा. आय. पी. कुटीन्हो, प्रा. सुभाष कोरी, प्रा. आशालता मगर, प्रा. अनिता चौगुले यांचा सत्कार झाला. आय. टी. नाईक, अजित कुलकर्णी यांची भाषणे झाली.
यावेळी एम. एस. शिंदे, आप्पासाहेब कमलाकर, पी. आर. शिंदे, आर. बी. कांबळे, नंदप्रभा चव्हाण, काशिनाथ सावेकर, आर. ए. पाटील यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
संघटनेचे उपाध्यक्ष संजय पाटील यांनी स्वागत केले. उषा नाईक यांनी सूत्रसंचालन केले, खजिनदार रावसाहेब कोडोली यांनी आभार मानले.
फोटो ओळी : गडहिंग्लज येथील कार्यक्रमात अनिता चौगुले यांचा प्रा. आशालता मगर यांनी सत्कार केला. डावीकडून शिवाजीराव होडगे, आय. टी. नाईक, आय. पी. कुटीन्हो उपस्थित होते.
क्रमांक : ०९०७२०२१-गड-०३