शिक्षकांनी शाळाबाह्य सर्वेक्षण करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:43 AM2021-03-04T04:43:06+5:302021-03-04T04:43:06+5:30
नवे पारगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षकांनी शाळाबाह्य सर्वेक्षण करावे, असे आवाहन हातकणंगलेचे ...
नवे पारगाव : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये, यासाठी शिक्षकांनी शाळाबाह्य सर्वेक्षण करावे, असे आवाहन हातकणंगलेचे शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ यांनी केले.
वाठार (ता. हातकणंगले) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळाबाह्य सर्वेक्षण कार्यशाळेत रवींद्र ठोकळ बोलत होते. केंद्र समन्वयक अजमीर मणेर अध्यक्षस्थानी होते.
राज्य शासनाच्यावतीने शाळाबाह्य, अनियमित व स्थलांतरित मुलांना शाळेच्या प्रवाहात दाखल करण्यासाठी विशेष मोहीम उघडली आहे. शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करण्यात येणार असून, सर्वेक्षणाचे काम १० मार्चपर्यंत पूर्ण होणार आहे, असेही रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले.
कन्या शाळेचे मुख्याध्यापक अशोक पाटील, जीवन शिक्षण अंबपचे मुख्याध्यापक प्रतापराव शिंदे, कन्या शाळा, अंबपचे मुख्याध्यापक मारुती पाटील, राजेंद्र रसाळ, प्रदीप गायकवाड आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : वाठार (ता. हातकणंगले) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत शाळाबाह्य सर्वेक्षण कार्यशाळेत मार्गदर्शन करताना हातकणंगलेचे शिक्षण विस्तार अधिकारी रवींद्र ठोकळ.