सर्जनशील विद्यार्थी घडविण्यावर शिक्षकांनी भर द्यावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:42 AM2021-02-06T04:42:36+5:302021-02-06T04:42:36+5:30

पांगिरे : चॉक व टॉक याबरोबरच कौशल्यपूर्ण शिक्षणाचा अवलंब करत शिक्षकांनी सर्जनशील विद्यार्थी घडविण्यावर भर देणे गरजेचे आहे. माजी ...

Teachers should focus on developing creative students | सर्जनशील विद्यार्थी घडविण्यावर शिक्षकांनी भर द्यावा

सर्जनशील विद्यार्थी घडविण्यावर शिक्षकांनी भर द्यावा

Next

पांगिरे : चॉक व टॉक याबरोबरच कौशल्यपूर्ण शिक्षणाचा अवलंब करत शिक्षकांनी सर्जनशील विद्यार्थी घडविण्यावर भर देणे गरजेचे आहे. माजी विद्यार्थ्यांनी एकत्रित येऊन आपल्याला शालेय जीवनात घडविणाऱ्या प्राथमिक शिक्षकास मानपत्र देऊन गुरूविषयी व्यक्त केलेला आदर हा गुरू-शिष्याचे नाते अधिक दृढ करणारा प्रसंग आहे, असे प्रतिपादन पं.स.चे माजी सभापती जगदीश पाटील यांनी व्यक्त केले. केंद्रशाळा पिंपळगाव (ता. भुदरगड) येथील शिक्षिका शशिकला शामराव पाटील यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित सत्कार कार्यक्रमात ते बोलत होते.

स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक के. एल. कांबळे यांनी केले.

यावेळी लिगाडे-पाटील कॉलेज, कराडचे संस्थापक अध्यक्ष बाजीराव पाटील, प्रा. विद्या पाटील, नामदेव मगदूम, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी मान्यवरांच्या हस्ते शशिकला पाटील यांचा शाल, श्रीफळ व मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. शशिकला पाटील यांनी शाळेच्या शिष्यवृत्ती उपक्रमासाठी दहा हजार रुपयांचा निधी मुख्याध्यापक यांच्याकडे सुपूर्द केला. या कार्यक्रमास शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश मगदूम, उपसरपंच उदय मिसाळ, अनिल आरबुने, रवींद्र पाटील, दत्तात्रय परीट, ग्रामसेवक रंगनाथ बोडके, केंद्रप्रमुख विठ्ठल मगदूम, शामराव पाटील, डॉ. काशिनाथ पोवार, डॉ. विनायक पाटील, राजाराम पाटील, शिवाजी चव्हाण, नामदेव ठाणेकर, सागर सुतार, उत्तम पाटील, मारुती नांदेकर आदी उपस्थित होते. आभार मधुकर भाटले यांनी मानले.

---

यावेळी शिष्यवृत्ती परीक्षेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली गुणवत्ता यादीत चमकलेल्या व विविध पदांवर कार्यरत असलेल्या विद्यार्थ्यांच्या वतीने आपल्या गुरूविषयी आदर व्यक्त करत शिक्षिका शशिकला पाटील यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन प्राथमिक शिक्षकास मानपत्र देऊन केलेला गौरव हा आपल्या सेवाकाळात आपणास मिळालेल्या अनेक पुरस्कारांपेक्षाही सर्वोत्कृष्ट असल्याचे यावेळी पाटील यांनी बोलताना सांगितले.

-----------------------------------------------------------------

Web Title: Teachers should focus on developing creative students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.