शिक्षकांनी नावीन्याची आस धरावी : प्राचार्य महादेव नरके

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:29 AM2021-09-07T04:29:25+5:302021-09-07T04:29:25+5:30

कोल्हापूर : सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्यंत वेगाने बदल होत आहेत. त्याच वेगाने शिक्षण क्षेत्रामध्येसुद्धा बदल होत आहेत. तंत्रज्ञानामध्ये सातत्याने ...

Teachers should hope for innovation: Principal Mahadev Narke | शिक्षकांनी नावीन्याची आस धरावी : प्राचार्य महादेव नरके

शिक्षकांनी नावीन्याची आस धरावी : प्राचार्य महादेव नरके

Next

कोल्हापूर : सध्या प्रत्येक क्षेत्रामध्ये अत्यंत वेगाने बदल होत आहेत. त्याच वेगाने शिक्षण क्षेत्रामध्येसुद्धा बदल होत आहेत. तंत्रज्ञानामध्ये सातत्याने होत असलेल्या बदलाला सामोरे जाण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षकांनी सातत्याने नावीन्याची आस धरावी, असे प्रतिपादन डॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निक प्राचार्य महादेव नरके यांनी रविवारी केले. वारणा शिक्षण संस्थेच्यावतीने ऐतवडे खुर्द येथे आयोजित शिक्षक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

डॉ. नरके म्हणाले, आपल्या देशाला गुरू-शिष्याची मोठी परंपरा आहे. सध्या विद्यार्थ्यांच्या शिक्षकाकडून अपेक्षा वाढल्या आहेत. त्यामुळे शिक्षकांनी स्वतःला अपडेट ठेवत कृतिशील शिक्षणावर भर देणे हीच महत्त्वाचे आहे. जी व्यक्ती काळाच्या कसोटीवर स्वतःमध्ये बदल घडवून आणते ती. स्पर्धेत टिकू शकते.

शिवाजी विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य संजय जाधव यांनी बदलत्या युगात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची असून, शिक्षकांनी सज्ज राहावे, असे प्रतिपादन केले. वारणा शिक्षण संस्थेचे सचिव प्रताप पाटील यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. या वेळी संस्थेचे संस्थापक दिवंगत बाजीराव बाळाजी पाटील आणि डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

संकुलातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला.

०६०९२०२१-कोल-नरके फोटो :

ऐतवडे खुर्द येथील वारणा शिक्षण संस्थेच्या शिक्षक दिन कार्यक्रमात प्राचार्य डॉ. महादेव नरके यांनी मार्गदर्शन केले. या वेळी संस्था सचिव डॉ. प्रताप पाटील, संजय जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: Teachers should hope for innovation: Principal Mahadev Narke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.