शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला व्हावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:30 AM2021-09-07T04:30:20+5:302021-09-07T04:30:20+5:30

येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बैठकीत शिक्षक सेनेच्यावतीने संतोष आयरे यांनी शिक्षक आणि शिक्षेकतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या ...

Teachers, staff salaries should be on a date | शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला व्हावे

शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन एक तारखेला व्हावे

Next

येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयातील बैठकीत शिक्षक सेनेच्यावतीने संतोष आयरे यांनी शिक्षक आणि शिक्षेकतर कर्मचारी यांच्या प्रलंबित मागण्या सर्वांसमोर मांडल्या. त्यावर प्रशासनाने तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी केली. सुमारे एक तास बैठक चालली. या सर्व मागण्या मान्य करून त्यानुसार कार्यवाही केली जाईल. संबंधित प्रशासनास त्याप्रमाणे सूचना दिल्या जातील, अशी ग्वाही सुभाष चौगुले यांनी दिली. शिक्षण विभागातील अधिकारी शंकर यादव, वसुंधरा कदम, जी. टी. पाटील, सागर काटकर, शिक्षक संघटनेतील कृष्णात धनवडे, टी. आर. पाटील, स्नेहलकुमार रेळेकर, सुरेंद्र तिके, रंगराव कुसाळे, एस. वाय. पाटील, भगवान खिरारी, आनंदा लोखंडे उपस्थित होते.

अन्य मागण्या

१) वैद्यकीय बिलांबाबत प्रशासनाने हलगर्जीपणा करू नये.

२) सर्व शिक्षकांची सेवा पुस्तके अपडेट करून दुय्यम कॉपी कर्मचाऱ्यांना द्यावी.

३) वर्षाअखेरीस गोपनीय अहवाल साक्षांकित प्रत कर्मचाऱ्यांना द्यावी.

४) मेडिकल बिल मंजुरी आदेश झाल्यावर वेतनपथक कार्यालयाने अन्य कागदपत्रे मागू नयेत.

५) खासगी शाळेतील विद्यार्थ्यांनाही क्रीडा प्रबोधिनीत प्रवेश मिळावा.

फोटो (०६०९२०२१-कोल-शिक्षक सेना) : कोल्हापुरात सोमवारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शिक्षक सेनेचे संतोष आयरे, आदींनी सहायक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांना दिले.

060921\06kol_13_06092021_5.jpg

फोटो (०६०९२०२१-कोल-शिक्षक सेना) : कोल्हापुरात सोमवारी शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार आणि शिक्षक सेनेचे संतोष आयरे, आदींनी सहाय्यक शिक्षण संचालक सुभाष चौगुले यांना दिले.

Web Title: Teachers, staff salaries should be on a date

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.