राज्य ग्रामीण खो-खो स्पर्धेसाठी संघ जाहीर
By admin | Published: November 11, 2015 11:11 PM2015-11-11T23:11:28+5:302015-11-11T23:35:59+5:30
सांगलीचे वर्चस्व: अहमदनगरला होणार स्पर्धा
सांगली : शेवगाव (जि. अहमदनगर) येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामीण खो-खो स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागाचा संघ जाहीर झाला आहे.जिल्हा क्रीडा संकुलामध्ये नव्याने तयार केलेल्या मैदानावर कोल्हापूर विभागीय १६ वर्षाखालील ग्रामीण खो-खो स्पर्धा पार पडल्या. सांगली, सातारा, कोल्हापूर व रत्नागिरी आदी जिल्'ांचे खेळाडू स्पर्धेत सहभागी झाले होते. मुले व मुली दोन्ही गटात यजमान सांगलीने आपला दबदबा राखत वर्चस्व मिळवले. या स्पर्धेतून अहमदनगर येथे होणाऱ्या राज्य स्पर्धेसाठी कोल्हापूर विभागाचा संघ निवडण्यात आला. स्पर्धेचे उद्घाटन उद्योजक मकरंद चितळे, विकास लागू, श्रीराम पटवर्धन यांच्याहस्ते झाले. अध्यक्षस्थानी जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक होते. यावेळी सम्राट शिंदे, कृष्णा शेंडगे, मानसिंग शिंदे, सुशांत गडदे, अभिजित परीट आदी उपस्थित होते. पंच म्हणून हणमंत सरगर, योगेश तोडकर, संजय हिरेकुर्ब, शशिकांत पाटील, मिलिंद सावर्डे यांनी काम पाहिले. राज्य स्पर्धेसाठी निवडण्यात आलेला खो-खो संघ असा : मुले : विश्वजित फार्णे (कर्णधार), अभिषेक केरिपाळे, संजय ऐवळे, प्रथमेश शेळके, शुभम पाटील, शिवप्रसाद माने, चेतन परीट, ऋत्विक कांबळे (सर्व सांगली), आदेश कांबळे, विशाल बल्लाळ (दोघे कोल्हापूर), दीपराज कांबळे (रत्नागिरी), शुभम जाधव (सातारा). राखीव : श्रीराज कदम (सातारा), ऋषिकेश परीट (कोल्हापूर), रोहित हंदे. मुली : अपेक्षा सुतार (कर्णधार : रत्नागिरी), कोमल शिंदे, धनश्री भोसले, पौर्णिमा शेवाळे, प्राजक्ता पवार, काजल पवार, आयेशा मुलाणी (सर्व सांगली), धनश्री पाटील (रत्नागिरी), श्रेया बोडरे, प्रतीक्षा कुरंगे, पल्लवी इमडे (तिघी सातारा). राखीव : नीलम चौगुले (कोल्हापूर), अश्विनी कोल्हापुरे (दोघी कोल्हापूर), स्वप्नाली मांडवकर (रत्नागिरी).