तपासासाठी औरंगाबादला पथक रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:43 AM2021-02-06T04:43:03+5:302021-02-06T04:43:03+5:30

कोल्हापूर : देवीच्या जागरासाठी लातूरहून कोल्हापुरात आणलेल्या कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध घालून लुटल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची तीन पथके ...

A team was sent to Aurangabad for investigation | तपासासाठी औरंगाबादला पथक रवाना

तपासासाठी औरंगाबादला पथक रवाना

Next

कोल्हापूर : देवीच्या जागरासाठी लातूरहून कोल्हापुरात आणलेल्या कलाकारांना जेवणातून गुंगीचे औषध घालून लुटल्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिसांची तीन पथके करण्यात आली आहेत. त्यापैकी एक पथक औरंगाबाद येथे गुरुवारी रवाना झाले.

मंगळवारी देवीचा जागर (आराधी) करण्यासाठी राचन्नावाडी (लातूर) येथील स्त्री, पुरुष अशा नऊ जणांना जेवणात गुंगीचे औषध घालून बेशुद्ध अवस्थेत असताना त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व रोकड लंपास केली. याच्या तपासासाठी लक्ष्मीपुरी व स्थानिक गुन्हे अन्वेषणने तीन पथकांची स्थापना केली. त्यापैकी एक पथक संशयिताचा शोध घेण्यासाठी औरंगाबादकडे रवाना झाले आहे. तर दुसरे पथक सीसीटीव्ही फुटेज तपासण्यासाठी व तिसरे पथक फोन काॅल (सीडीआर) तपासासाठी तयार करण्यात आले आहे. गुंगीत असलेल्या नऊ जणांवर अजूनही सीपीआर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यातील एका महिलेची प्रकृती गंभीर असून इतर आठ जण बोलण्याच्या मन:स्थितीत नाहीत. संशयिताने या कलाकारांना जागर कार्यक्रमासाठी अडीच हजार रुपये रोख न देता बँकेत भरले असल्याचे तपासात पुढे आले आहे.

Web Title: A team was sent to Aurangabad for investigation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.