राज्य कुमार कबड्डी संघाच्या कर्णधारपदी तेजस पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 04:22 AM2021-03-20T04:22:48+5:302021-03-20T04:22:48+5:30
कोल्हापूर : तेलंगणा येथे रविवार (दि. २२) पासून होणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय कुमार कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ ...
कोल्हापूर : तेलंगणा येथे रविवार (दि. २२) पासून होणाऱ्या ६८ व्या राष्ट्रीय कुमार कबड्डी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याचा संघ जाहीर झाला. यात सडोली खालसा (ता. करवीर) येथील तेजस मारुती पाटील याची कर्णधारपदी निवड झाली.
तेजस हा उत्कृष्ट चढाईपटू असून अनेक स्पर्धांमध्ये त्याने नामांकित संघांना हरवले आहे. यापूर्वीही त्याने राज्य कुमार गटाचे दोन वेळा प्रतिनिधीत्व केले आहे. एकोणीस वर्षाखालील शालेय स्पर्धेसाठीही त्याची निवड झाली होती. त्याचे वडील मारुती पाटील यांचीही १९९२ साली राष्ट्रीय कुमार गटासाठी राज्य संघातून निवड झाली होती. सध्या ते पोलीस दलात आहेत.
तेजस याला गोकुळ शिरगाव येथील ई प्रसाद राव ॲकॅडमीत आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक रमेश भेंडिगिरी, उमा भेंडिगिरी, ज्येष्ठ कबड्डी संघटक प्रा. संभाजी पाटील व वडील मारुती पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो : १९०३२०२१-कोल-तेजस पाटील