राष्ट्रीय हॉकी स्पर्धेसाठी तेजस्विनी खराडे हिची राज्य संघात निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:22 AM2021-03-28T04:22:24+5:302021-03-28T04:22:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : हॉकी इंडियाच्या वतीने ३ ते १२ एप्रिलअखेर सिमडेगा (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : हॉकी इंडियाच्या वतीने ३ ते १२ एप्रिलअखेर सिमडेगा (झारखंड) येथे होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनियर मुलींच्या हॉकी स्पर्धेसाठी कोल्हापूरच्या तेजस्विनी पुंडलिक खराडे (शाम स्पोर्ट्स) हिची महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली. राखीव खेळाडू म्हणून सानिका झांजगे व पूनम पाटील यांचीही निवड झाली.
यासाठीचा स्पर्धापूर्व कॅम्प बालेवाडी (पुणे) येथे झाला. तेजस्विनीची सलग दोन वेळा राष्ट्रीय शालेय हॉकी स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्य संघात निवड झाली होती. ती भोगावती महाविद्यालय (कुरुकुली)ची हॉकी खेळाडू व भाई सी. बी. पाटील विद्यालय (हसूर दुमाला)ची माजी विद्यार्थिनी आहे. या खेळाडूंना हॉकी महाराष्ट्रचे सेक्रेटरी मनोज भोरे, हॉकी कोल्हापूरच्या अध्यक्षा सुरेखा पाटील, उपाध्यक्ष विनोद नाईकवाडी, ट्रेझरर सागर जाधव, शाम स्पोर्ट्सचे हॉकी प्रशिक्षक मोहन भांडवले यांचे मार्गदर्शन लाभले.
२७०३२०२१- कोल - तेजस्विनी खराडे