देशाचं कल्याण होवू दे, तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांचे अंबाबाईला साकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2022 03:26 PM2022-03-24T15:26:22+5:302022-03-24T15:30:27+5:30
देवीच्या दर्शनाची इच्छा आज पूर्ण झाली. देशाची प्रगती होवू हे, जनतेचं कल्याण होवू दे असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य टाळले.
कोल्हापूर : तेलंगणाचेमुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव यांनी सपत्नीक आज, गुरुवारी करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. देवीच्या दर्शनाची इच्छा आज पूर्ण झाली. देशाची प्रगती होवू हे, जनतेचं कल्याण होवू दे असे साकडे घातल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी राजकीय भाष्य टाळले.
तेलंगणाचेमुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव हे सकाळी साडे अकरा वाजता कोल्हापूर विमानतळावर उतरले. साडे बारा वाजता अंबाबाईच्या दर्शनासाठी आले. यावेळी त्यांच्यासोबत पत्नी शोभाराव, खासदार संतोष, श्रावण रेड्डी, प्रधान सचिव अनिलकुमार होते. काही क्षणातच देवीची आरती सुरू झाल्याने त्यांना आरतीचा लाभ मिळाला. शंखतीर्थ होईपर्यंत जवळपास पाऊणतास मंदिरात होते.
या दरम्यान त्यांनी मातृलिंगाचे देखील दर्शन घेतले. अंबाबाई मंदिराची माहिती घेतली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्यावतीने सचिव शिवराज नाईकवाडे यांनी त्यांचे स्वागत व सत्कार केला. दर्शनानंतर ते शनि मंदिर मार्गे मंदिराबाहेर आले.
यानंतर चंद्रशेखरराव यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, आम्ही देवावर विश्वास ठेवणारी माणसं आहोत. बऱ्याच दिवसांपासून अंबाबाईचे दर्शन घेण्याची इच्छा होती. ती आज पूर्ण झाली. अगदी प्रसन्न वाटले. देशाची प्रगती होवू हे, देशाचे आणि जनतेचे कल्याण होवू हे असे मागणं देवीकडे मांडल्याचे ते म्हणाले.