गगनबावडा तालुक्यातील शासकीय कार्यालयांचे दूरध्वनी बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 04:25 AM2021-03-31T04:25:29+5:302021-03-31T04:25:29+5:30
गगनबावडा येथे तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, दुय्यम निबंधक कार्यालय, सामाजिक वनिकरण, सहा. निबंधक, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उपकोषागार, ...
गगनबावडा येथे तहसीलदार कार्यालय, पोलीस स्टेशन, पंचायत समिती, दुय्यम निबंधक कार्यालय, सामाजिक वनिकरण, सहा. निबंधक, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, उपकोषागार, वनविभाग,
कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय,
महावितरण उपविभागीय कार्यालय, सब पोस्ट कार्यालय, तसेच बॅंक ऑफ इंडियासह सहकारी बॅंका, शेतकरी सहकारी संघ, शिक्षण विभाग आदी कार्यालयांचे लँडलाईन दूरध्वनी गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद आहेत. यातील काही दूरध्वनी दूरसंचारने लक्ष न दिल्याने, तर काही जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याने बंद असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे या कार्यालयाचे कार्यालयप्रमुख संपर्कहीन झाले असल्याचे चित्र गगनबावडा तालुक्यात आहे.
गेल्या चार-पाच महिन्यांपासून महत्त्वाचे असणारे तहसीलदार कार्यालय व गगनबावडा पोलीस स्टेशनच्या बंद असणाऱ्या दूरध्वनीमुळे कोरोना असो अथवा तालुक्यात घडणारी गुन्हेगारी घटना असो, कोणतीच माहिती प्रशासनास जनतेला तात्काळ देता येत नाही. तालुक्यात अनेकदा रात्री-अपरात्री घडणा-या लहान-मोठ्या गुन्हेगारीविषयक घटनेत पोलीस व महसूल प्रशासनाची तात्काळ गरज असते; मात्र ती बंद दूरध्वनी सेवेमुळे जनतेला मिळत नाही. त्यामुळे या सेवा म्हणजे ‘बैल गेला आणि झोपा केला’ अशी झाली आहे.