तेलगू टायटन्सने लावली चंदगडी खेळाडूवर कोटींची बोली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 04:52 AM2021-09-02T04:52:00+5:302021-09-02T04:52:00+5:30
सिद्धार्थला तेलगू टायटन्सने मोठी किमत मोजत आपल्या संघात कायम ठेवले आहे. त्याच्या या मोठ्या मागणीमुळे तालुक्याचा सर्वांत महागडा खेळाडू ...
सिद्धार्थला तेलगू टायटन्सने मोठी किमत मोजत आपल्या संघात कायम ठेवले आहे. त्याच्या या मोठ्या मागणीमुळे तालुक्याचा सर्वांत महागडा खेळाडू तो ठरला आहे. त्यामुळे त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोमवारी प्रो-कबड्डीसाठी झालेल्या लिलावात सिद्धार्थला संघात घेण्यासाठी युपी योद्धा आणि पटना पायरटमध्ये यांच्यामध्ये चढाओढ सुरू होती. अखेर युपी योद्धाने १ कोटी ३० लाखांच्या किमतीत बोली जिंकली. मात्र, त्याचवेळी तेलगू टायटन्सने फार विचार न करता एफबीएम कार्डचा वापर केला आणि सिद्धार्थला १ कोटी ३० लाखाच्या किमतीत आपल्या संघात कायम केले. सिद्धार्थने मागील हंगामात तेलगूकडून उत्कृष्ट खेळ केला होता. मागील हंगामात त्याने एकूण २२० गुण मिळवले होते. विशेष म्हणजे त्यातील २१७ गुण त्याने चढाई करताना मिळवले होते. तो सर्वाधिक चढाई गुण मिळविणाऱ्यांमध्ये चौथ्या क्रमांकावर होता.
चौकट
चढाई गुण मिळवणारा खेळाडू
त्याआधी सहाव्या हंगामातून त्याने प्रो कबड्डीमध्ये पदार्पण केले होते. त्याने पदार्पणाच्या हंगामात चढाई आणि पकड मिळून २२१ गुण मिळवले होते. यातील २१८ गुण त्याने चढाईमध्ये मिळवले होते. तो ६ व्या मोसमात सर्वाधिक चढाई गुण मिळवणारा तिसऱ्या क्रमांकाचा खेळाडू ठरला होता.
तो पुन्हा एकदा तेलगू टायटन्सने संघाचे प्रतिनिधित्व करणार असून चंदगडचे नाव पुन्हा एकदा देशपातळीवर चमकले आहे.
सिद्धार्थ देसाई : ३१०८२०२१-गड-०१