मंदिर राज्य संरक्षित स्मारक

By admin | Published: July 31, 2016 12:54 AM2016-07-31T00:54:38+5:302016-07-31T00:54:38+5:30

अधिसूचना जारी : हरकतींसाठी दोन महिन्यांची मुदत

Temple state protected monument | मंदिर राज्य संरक्षित स्मारक

मंदिर राज्य संरक्षित स्मारक

Next

कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्याची प्राथमिक अधिसूचना पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून जारी करण्यात आली. या अधिसूचनेमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून सुधारणांच्या नावाखाली मंदिराची होत असलेली हेळसांड थांबणार आहे. दोन महिन्यांनंतर यावर अंतिम शिक्कामोर्तब होईल. ही अधिसूचना २० जुलैला प्रकाशित करण्यात आली असून ती शनिवारी अंबाबाई मंदिरात लावण्यात आली.
या अधिसूचनेनुसार अंबाबाई मंदिर राज्य संरक्षित स्मारक क्षेत्राच्या चतु:सीमा पूर्व रस्ता, पश्चिम महाद्वार रस्ता, दक्षिण गल्ली व उत्तरेला जोतिबा रस्ता असे ठरवण्यात आले आहे.
या अधिसूचनेवरील हरकतींच्या अधिसूचना प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या कालावधीत विचार केला जाईल.
-------------------
अंबाबाईचे मंदिर पुरातन असूनही केवळ शासनाच्या यादीत त्याचा समावेश नसल्याने सुधारणांच्या नावाखाली अनावश्यक बदल केले गेले. त्यामुळे हेमाडपंथी बांधकामाच्या मूळ सौंदर्याला बाधा आली. मात्र डागडुजीची वेळ आली की पुरातत्त्व विभाग मान्यता देत नाही, अशी पळवाट काढली जायची. दुसरीकडे पुरातत्त्व खाते आमच्या यादीत मंदिर नाही, अशी भूमिका घ्यायचे. त्यामुळे मंदिराची अवस्था कुणीही या, काहीही करा अशी झाली होती. या अधिसूचनेमुळे या सगळ््या प्रकारांना आता आळा बसणार आहे.
दृष्टिक्षेपात...
४महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपिठांपैकी प्रमुख देवता
४दोन हजार वर्षांपूर्वीचे मंदिर असल्याची नोंद
४हेमाडपंथी स्थापत्याचा उत्तम नमुना
४मंदिराचे क्षेत्रफळ ७०५४ चौरस मीटर
४वर्षभरात देशभरातील २५ लाख भाविक देतात भेट

Web Title: Temple state protected monument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.