म्हाकवेत लोकसहभागातून उभारले मंदिर--२८ लाख ,लोकवर्गणी व श्रमदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 08:25 PM2017-09-19T20:25:25+5:302017-09-19T20:27:42+5:30
म्हाकवे : शेकडो गुंफलेल्या हातांनी श्रमदान आणि स्वकमाईतील २८लाख रुपये खर्च करून म्हाकवे ता.कागल येथील गावकर्यांनी
म्हाकवे : शेकडो गुंफलेल्या हातांनी श्रमदान आणि स्वकमाईतील २८लाख रुपये खर्च करून म्हाकवे ता.कागल येथील गावकर्यांनी गावची पांढरी म्हणून ओळखल्या जाणा?्या ग्रामदैवत गावडूबाई देवीचे मंदिर उभारले आहे. वास्तुकलेचा नमूना असणा?्या या मंदिरामध्ये मुर्ती प्रतिष्ठापना सभारंभ ही मोठ्या थाटामाटात संपन्न करण्याचे नेटके संयोजन गावकर्यांनी केले आहे. हा समारंभ दि.२२ते २५ या दरम्यान चार दिवस चालणार आहे.सर्व माहेरवाशिणीसह नोकरी व्यवसाय निमित्त परगावी असणा?्यांनाही या सभारंभासाठी निमंत्रित करण्यात आले आहे
अनादिकालापासून गावच्या मध्यभागी एका उंच तटावर (टेकडीवर)गावडूबाई देवीचे मंदिर आहे. पुर्वी या मंदिरासभोवतीच गाव वसले सध्या गावचा झपाट्याने विस्तार झाला आहे तरीही सर्व गावकरी भावभक्तीने एकसंध होत दोन वषार्पुर्वी या जीर्ण झालेल्या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्धार केला.
गावातील माजी सैनिक व विविध क्षेत्रातून निवूत्त झालेल्यासह वयोवृद्ध शेतकरी व तरूणांनी पुढाकार घेऊन या मंदिराच्या जीर्णोद्धार च्या कामाला सुरुवात केली. या कामाला सर्वच गावकर्यांनी जोरदार साथ दिली.मोठया प्रमाणात लोकवर्गणी ही जमा करुन आर्थिक हातभार लावला. त्यामुळे अनेक दिवसांपासून असणारे मंदिराच्या जीर्णोद्धाराचे स्वप्न सत्यात उतरले.याबाबत गावकर्यांत नवचैतन्य पसरले आहे.
यासाठी बाबूराव पाटील, भिकाजी पोवार, रामचंद्र पाटील, बी.के.पाटील,बापू आप्पा पाटील आर एस पाटील, एस के पाटील एकनाथ पाटील,के एस पाटील,जी.के. पाटील शिवराम चौगुले,एम जी पाटील, एच.एन.पाटील व्ही बी पाटील, तुकाराम सोनबा पाटील, आनंदा चौगुले, रामचंद्र सुतार आदीसह सर्व तरुण मंडळाचे कार्यकर्ते, ट्रक्टर वाहतूक संघटना व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.
कार्यक्रमाची रुपरेषा अशी...
शुक्रवार दि.22रोजी सकाळी श्री गावडूबाई देवीची गावातील मुख्य मार्गावरून सवाद्य स्वागत मिरवणूक. दि.22व23रोजी पुरोहितांच्या हस्ते विधिवत धार्मिक पूजा. तर सोमवार दि.२४रोजी प.पू.परमात्मराज महाराज (आडी मल्लया)यांच्या हस्ते देवीची मूर्ती प्रतिस्थापना करण्यात येणार आहे यावेळी महाराज यांचे प्रवचन होवून महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार असल्याचे संयोजकांच्या वतीने सांगण्यात आले.
फोटो ओळ..म्हाकवे येथिल गावडूबाई मंदिर छाया.. दत्तात्रय पाटील