सेनापती कापशी घाटावरील मंदिरे पाण्याखाली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:15 AM2021-07-23T04:15:44+5:302021-07-23T04:15:44+5:30
सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्याला बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. गुरुवारी सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे चिकोत्रा ...
सेनापती कापशी : चिकोत्रा खोऱ्याला बुधवारी सायंकाळपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले. गुरुवारी सकाळपासून पडत असलेल्या पावसामुळे चिकोत्रा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली. चिकोत्रा नदी दुथडी भरून वाहत आहे. सेनापती कापशी (ता. कागल) येथील नदी घाटावरील दत्त मंदिर व हनुमान मंदिर पाण्याखाली बुडाले आहे.
चिकोत्रा खोऱ्यातील ओढे-नाले दुथडी भरून वाहत आहेत. परिसरातील सर्वच ओढ्यांना पूर आल्याने पूल पाण्याखाली गेले आहेत. यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद पडली आहे. चिकोत्रा नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
बेरडवाडी - हणबरवाडी (ता. कागल) दरम्यान असणाऱ्या ओढ्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने गडहिंग्लज मार्गावरील वाहतूक काहीकाळ खोळंबली.
फोटो : सेनापती कापशी (ता. कागल ) येथील चिकोत्रा नदी घाटावरील दत्त व हनुमान मंदिरे पाण्याखाली बुडाली.