शिरोली दुमाला येथे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात दहा बकऱ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2021 04:17 AM2021-06-05T04:17:45+5:302021-06-05T04:17:45+5:30
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त वृत्तानुसार एकनाथ पाटील यांच्या मालकीच्या गुरवाची खडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आंब्याच्या बागेत रघुनाथ विठ्ठल गावडे ...
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त वृत्तानुसार एकनाथ पाटील यांच्या मालकीच्या गुरवाची खडी या नावाने ओळखल्या जाणाऱ्या आंब्याच्या बागेत रघुनाथ विठ्ठल गावडे (रा. सावरवाडी) यांचा चारशे बकऱ्यांचा तळ गेली चार दिवस बसला होता. गुरुवारी मध्यरात्रीही माॅन्सूनपूर्व पाऊस सुरू होता.
मेंढपाळ लोक रात्रीच्या वेळी नजीकच्या शेडमध्ये झेपी गेल्याने मेंढपाळांच्या कळपात शांतता होती. मध्यरात्री बकऱ्यांच्या तळावर वनप्राण्यांनी हल्ला केल्याचे सकाळी कळपात मेंढपाळ लोक गेल्याने त्यांच्या निर्देशनास आले. या हल्ल्यात दहा बकरी मृत्यू पावल्याचे पाहणीत आढळले. या घटनेमुळे मेंढपाळ व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, घटनास्थळी यशवंत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमोडे, वन विभागाचे अधिकारी डॉ. ए. एस. इंगळे, डॉ. ए. एस. माने, वनरक्षक विजय पाटील, यशवंत क्रांती संघटनेचे करवीर तालुकाध्यक्ष बाळासाहेब कोळेकर, बाबासाहेब धनगर आदींनी त्वरित धाव घेऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा केला.
फोटो ओळ : शिरोली दुमाला (ता. करवीर) येथील गुरवाची खडी परिसरात गुरुवारी मध्यरात्री बकऱ्यांच्या कळपावर वन प्राण्यांनी हल्ला केला. या घटनेत दहा बकऱ्यांचा मृत्यू झाला.