दहा लाख टन ऊस शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2016 12:32 AM2016-03-30T00:32:19+5:302016-03-30T00:32:35+5:30
कोल्हापूर विभागाची परिस्थिती : हंगाम एप्रिलमध्यापर्यंत लांबणार
कोल्हापूर : कोल्हापूर विभागातील १७ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला असला तरी विभागात अजून दहा लाख टन ऊस शिल्लक आहे. हा ऊस उचलण्यासाठी कारखान्याच्या तोडणी यंत्रणेला कसरत करावी लागत आहे. विभागातील ३८ साखर कारखान्यांनी आतापर्यंत २ कोटी १६ लाख ८ हजार ३९८ टन गाळप केले असून, आतापर्यंतचे हे उच्चांकी गाळप झाले आहे. १० एप्रिलपर्यंत बहुतांशी कारखाने बंद होण्याची शक्यता आहे.
यंदाच्या हंगामात विभागातील बहुतांशी साखर कारखाने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू झाले. गेले पाच महिने अखंडितपणे हंगाम सुरू आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर उसाचे उत्पादन कमी मिळणार असे आडाखे साखर कारखान्यांचे होते, पण गतवर्षीपेक्षा जादा गाळप झाले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील २१ कारखान्यांनी यंदा हंगाम घेतला. दिवसाला सरासरी ६३ हजार टन गाळप करत आतापर्यंत १ कोटी ३८ लाख ९२ हजार २२५ टन उसाचे गळीत केले आहे. सांगली जिल्ह्यातील १७ कारखान्यांनी रोज ३४ हजार टन गाळप करत ७७ लाख १६ हजार १४३ टनांचे गळीत केले आहे.
आतापर्यंत कोल्हापूर जिल्ह्यातील ९, तर सांगलीमधील ८
कारखान्यांचा हंगाम संपला आहे. अजून विभागात १0 लाख टन ऊस शिल्लक असून, जवाहर-हुपरी व दत्त-शिरोळ वगळता सर्व कारखान्यांची धुराडी १० एप्रिलपर्यंत थंड होणार आहे. साधारणत: यंदा २
कोटी २५ लाख टन गाळप होईल, असा अंदाज असून कारखाना प्रशासनाने यंत्रणा सक्रिय केली आहे.
याचा संपला हंगाम :
गडहिंग्लज, राजाराम, आजरा, गायकवाड, डी. वाय. पाटील, दालमिया, इको केन, हेमरस, महाडिक शुगर्स, वसंतदादा, माणगंगा, महाकाली, डफळे जत, मोहनराव शिंदे, निनाईदेवी, यशवंत खानापूर, सद्गुरू राजेवाडी.
याचा संपला हंगाम :
गडहिंग्लज, राजाराम, आजरा, गायकवाड, डी. वाय. पाटील, दालमिया, इको केन, हेमरस, महाडिक शुगर्स, वसंतदादा, माणगंगा, महाकाली, डफळे जत, मोहनराव शिंदे, निनाईदेवी, यशवंत खानापूर, सद्गुरू राजेवाडी.