नृत्यगंना नाचवल्याप्रकरणी माजी उपसरपंचांसह दहा जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:45 AM2021-03-13T04:45:46+5:302021-03-13T04:45:46+5:30

सडोली (खालसा) : साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगतानिमित्ताने करवीर तालुक्यातील कांडगाव ते हळदी यादरम्यान ट्रॅक्टरचालकांनी मिरवणूक काढून नृत्यांगना नाचवून ...

Ten people, including a former deputy commissioner, have been booked for dancing | नृत्यगंना नाचवल्याप्रकरणी माजी उपसरपंचांसह दहा जणांवर गुन्हा

नृत्यगंना नाचवल्याप्रकरणी माजी उपसरपंचांसह दहा जणांवर गुन्हा

Next

सडोली (खालसा) : साखर कारखान्याच्या गळीत हंगाम सांगतानिमित्ताने करवीर तालुक्यातील कांडगाव ते हळदी यादरम्यान ट्रॅक्टरचालकांनी मिरवणूक काढून नृत्यांगना नाचवून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल दहा जणांविरोधात करवीर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

यामध्ये कांडगावमधील माजी उपसरपंचांसह ८ व वाशीतील २ यामध्ये समावेश आहे.

याबाबत कांडगावचे पोलीस पाटील राहुल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विनायक बाळासोा शिंदे, अजित तुकाराम शिंदे, संदीप रघुनाथ घोसरवाडे, सचिन रघुनाथ घोसरवाडे, शिवम भगवान पाटील, विजय शंकर नाईक, बाबासोा अनंत चव्हाण, बाजीराव दिनकर मिसाळ, सर्व (रा. कांडगाव) , कृष्णात अशोक बुडके, कृष्णात बंडा पाटील, (रा. वाशी, ता. करवीर) यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम कलम ५१ (ब), महाराष्ट्र कोविड उपाययोजना कलम ११, साथरोग प्रतिबंधक अधिनियम कलम २ व ३ यासह अन्य दोन अधिनियमांतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्वांवर हंगाम सांगतेच्या निमित्ताने सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे लोक जमविणे, साऊंड लावून नृत्यागंना नाचवून मिरवणूक काढल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Ten people, including a former deputy commissioner, have been booked for dancing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.