दहाजणांना मिळणार दुबार संधी

By admin | Published: April 6, 2017 12:52 AM2017-04-06T00:52:53+5:302017-04-06T00:52:53+5:30

जिल्हा परिषद : ७३ सदस्यांतून ८३ समिती सदस्य निवडणार : १७ ते २0 एप्रिलच्या दरम्यान सभा

Ten people will have a chance to dubble | दहाजणांना मिळणार दुबार संधी

दहाजणांना मिळणार दुबार संधी

Next



कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या ७३ सदस्यांमधून ८३ समिती सदस्यांची निवड करण्यासाठी १७ ते २० एप्रिलच्या दरम्यान सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात येणार आहे. पदे जास्त आणि सदस्यसंख्या कमी यामुळे दहाजणांना दोन विषय समित्यांमध्ये काम करण्याची संधी मिळणार आहे. त्यासाठी आता भाजता आणि मित्रपक्षांमध्ये बैठकांचे सत्र सुरू होणार आहे.
जिल्हा परिषदेच्या कामकाजाच्या दृष्टीने महत्त्वाचे असणाऱ्या स्थायी समितीचे अध्यक्ष हे पदसिद्ध सभापती असतात तर विषय समित्यांचे ५ सभापती हे सदस्य असतात. उर्वरित ८ सदस्यांमध्ये २ सदस्य हे अनुसूजित जाती व जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्गातील घेणे बंधनकारक आहे. या समितीमध्ये एकूण १४ जणांचा समावेश असतो.
जलव्यवस्थापन व स्वच्छता समितीमध्ये १२ सदस्य असतात. त्याचेही पदसिद्ध सभापती हे अध्यक्ष असतात. ५ विषय समिती सभापती आणि उर्वरित ६ सदस्यांचा
समितीत समावेश असतो. त्यापैकी ३ महिला सदस्य असणे बंधनकारक असते.
कृषि समितीमध्ये ११ सदस्य असतात यामध्ये जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हे या समितीचे अध्यक्ष असावेत असा संकेत आहे तर १० निवडून आलेल्या सदस्यांचा समितीत समावेश करावा लागतो. समाजकल्याण समितीमध्ये १२ सदस्य असतात. त्यामध्ये सभापती, निवडून आलेल्या ९ सदस्यांपैकी ५ सदस्य हे अनुसूचित जाती, जमातीचे राखीव असावे लागतात. त्यापैकी २ अनुसूचित जमातीचे तर उर्वरित ४ हे नागरिकांचा मागास प्रवर्गातील निवडावे लागतात. शिक्षण समितीमध्ये सभापती व निवडून आलेल्या ८ सदस्य अशा ९ जणांचा समावेश असतो.
बांधकाम समितीकडे पाहिले जाते. येथेही एक सभापती व निवडून आलेल्यांपैकी ८ सदस्यांचा समावेश असतो. अर्थ, पशुसंवर्धन व दुग्धशाळा विकास समिती व आरोग्य समितीमध्ये प्रत्येकी एक सभापती व ८ निवडून आलेल्यांपैकी सदस्यांचा
समावेश करावा लागतो. महिला व बालकल्याण समितीमध्ये सभापती
१ व निवडून आलेल्या सदस्यांपैकी ८ सदस्य निवडता येतात.
यामध्ये किमान ७० टक्के महिला असाव्यात असा नियम आहे. अशा पद्धतीने एकूण १०३ पदे
भरावयाची असून ६७ सदस्य व १२ सभापती असे ७९ जण सभागृहात सदस्य असणार आहेत. त्यातील सहा पदाधिकाऱ्यांना २० पदे आपोआपच मिळतात. त्यामुळे उर्वरित ८३ पदांवर ७३ सदस्यांमधून निवड करावी लागणार आहे.संख्या आणि पदे पाहता १० सदस्यांना दोन समित्यांमध्ये
काम करण्याची संधी मिळणार
आहे.
१७ ते २० च्या दरम्यान निवड सभा
विषय समित्यांचे सदस्य निवडण्यासाठी १७ ते २० एप्रिलच्या दरम्यान सर्वसाधारण सभा आयोजित केली जाणार आहे. त्यामध्ये ही सदस्यांची निवड केली जाईल. जर त्या त्या समितीच्या सदस्यसंख्येइतकीच नावे आली तर निवडी बिनविरोध होतील. नावे जास्त आली तर पुन्हा मतदान घ्यावे लागेल.
बांधकाम, ‘स्थायी’कडे विशेष लक्ष
जिल्हा परिषदेत स्थायी समिती आणि बांधकाम समितीकडे सर्वांचे विशेष लक्ष असते. जिल्हा परिषदेच्या कारभाराचे धोरण स्थायी समितीमध्ये ठरविले जाते. त्यामुळे या समितीत भाजता आणि मित्रपक्षांच्या सदस्यांना स्थान मिळण्याची शक्यता आहे तर बांधकामसारख्या महत्त्वाच्या समितीतही वजनदार नावे पाहावयास मिळणार आहेत.

Web Title: Ten people will have a chance to dubble

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.