जिल्ह्यातील अकरा योजनांकडे दहा कोटींची पाणीपट्टी थकित
By admin | Published: February 2, 2015 11:20 PM2015-02-02T23:20:49+5:302015-02-02T23:41:57+5:30
वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर : पांढरा हत्ती पोसणार कोण?
सांगली : जिल्ह्यातील अकरा प्रादेशिक पाणीपुरवठा योजनांकडे दहा कोटींची पाणीपट्टी थकित आहे. यामुळे महावितरणचे वीज बिल वेळेवर भरले जात नसल्यामुळे दोन महिन्याला योजनांचा वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे १०३ गावांतील जनतेला पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. दिवसेंदिवस पाणीपट्टी आणि वीज बिलाच्या थकबाकीचा डोंगर वाढत असल्यामुळे प्रादेशिक पाणी योजनांचा पांढरा हत्ती कोण आणि कसा पोसणार?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
जिल्हा परिषदेकडून सुरु असलेल्या अकरा प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजनांपैकी बहुतांशी योजना कालबाह्य झालेल्या आहेत. काही योजना तर वीस ते पंचवीस वर्षापूर्वीच्या आहेत. या योजनांच्या वितरण व्यवस्थेला अनेक ठिकाणी गळती लागली आहे. यामुळे ग्रामस्थांना पुरेशा दाबाने पाणी मिळत नाही. या पाणी गळतीमुळे महिनाभर पाण्यापासून वंचित रहावे लागते. अन्य योजना, विहिरींचे पाणी ग्रामस्थांना प्यावे लागते. नियमित पाणी पुरवठा होत नसल्यामुळे ग्रामस्थांकडून पाणीपट्टी भरण्याकडे दुर्लक्ष होत आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे ग्रामपंचायतीकडून पाणीपट्टी वसूल झाल्यानंतर २० टक्के गावातील विकासासाठी निधी ठेवून ८० टक्के रक्कम जिल्हा परिषदेकडे जमा झाली पाहिजे. पण, ग्रामपंचायतींकडून वसूल केलेली रक्कमच जिल्हा परिषदेकडे भरली जात नसल्याची धक्कादायक माहितीही पुढे आली आहे. यामुळे योजनांकडील कोट्यवधीच्या थकित पाणीपट्टीचा डोंगर दिवसेंदिवस वाढत आहे. यातूनच महावितरण कंपनीचीही थकबाकी वाढली आहे. सध्या अकरा प्रादेशिक योजनांकडेच महावितरणची वीज बिलाची आठ कोटींची थकबाकी आहे. या थकबाकी वसुलीसाठी वारंवार महावितरण कंपनीकडून वीज पुरवठा खंडित केला जात आहे. याचाही ग्रामस्थांना फटका बसत असून, पाण्यासाठी १०३ गावांतील लाखो ग्रामस्थांना भटकंती करावी लागत आहे. गावचे पुढारे, काही ग्रामसेवक, पाणी योजनेकडील कर्मचाऱ्यांच्या चुका आणि कालबाह्य योजनांमुळे प्रादेशिक योजना चालविणे हेच गावे आणि जिल्हा परिषदेसमोर आव्हान आहे.(प्रतिनिधी)
प्रादेशिक योजनांकडील थकबाकी
योजनागावांची संख्यापाणी कनेक्शनथकबाकी
मणेराजुरी२६४६६६१०५.५५ लाख
येळावी९१४२८१९.६६ लाख
पेड४९३३१९.४४ लाख
क़महांकाळ/ विसापूर१६३४०१५६.२० लाख
कुंडल१७५८७९२०२.४६ लाख
रायगाव५१९०२२.२४ लाख
कासेगाव१५१६४९७२७२.३५ लाख
जुनेखेड/ नवेखेड२५८०३५.३४ लाख
नांद्रे-वसगडे७७६४२२७.०१ लाख
तुंग-बागणी९१०८४१०५.२१ लाख
वाघोली३१०९२३.७७ लाख
एकूण१०३४१७३७९३३.२३ लाख