अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी दहा हजार जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:30 AM2021-09-16T04:30:42+5:302021-09-16T04:30:42+5:30

दुसऱ्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करता येणार आहे. या फेरीतील वेळापत्रक निश्चितीसाठी केंद्रीय समितीची बुधवारी महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर ...

Ten thousand seats for the second round of the eleventh | अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी दहा हजार जागा

अकरावीच्या दुसऱ्या फेरीसाठी दहा हजार जागा

Next

दुसऱ्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांना नव्याने अर्ज करता येणार आहे. या फेरीतील वेळापत्रक निश्चितीसाठी केंद्रीय समितीची बुधवारी महाराष्ट्र हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये बैठक झाली. त्यानंतर समितीने सायंकाळी पाच वाजता प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर केले. यावेळी समितीचे कार्याध्यक्ष आर. एस. रामाणे, सचिव सुभाष चौगुले, सदस्य पी. एस. जाधव, आर. व्ही. कोळेकर, देवेंद्र भोसले आदी उपस्थित होते. समितीने पहिल्या फेरीतील प्रवेशासाठी ७,३५६ विद्यार्थ्यांची निवड यादी जाहीर केली होती. त्यातील एकूण ३,९७९ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले असून हवे असणारे महाविद्यालय मिळाले नसल्याने उर्वरित ३,३७७ जणांनी या फेरीकडे पाठ फिरविली. रिक्त राहिलेल्या १० हजार ७०१ जागांसाठी समितीकडून दुसरी फेरी घेतली जाणार असून त्याची सुरूवात शुक्रवारी होईल. ज्या विद्यार्थ्यांना अर्जात विद्याशाखा, माध्यम, प्राधान्यक्रम, आरक्षण आदी स्वरूपातील बदल करावयाचा आहे. त्यांनी त्यांच्या पूर्वीचा अर्ज संकेतस्थळावर लॉगीन करून रद्द (डिलीट) करावा. नवीन अर्ज प्रक्रिया शुल्कासह भरायचा आहे. ज्या विद्यार्थ्यांनी अद्यापही ऑनलाईन प्रवेश अर्ज भरला नाही. त्यांना नव्याने अर्ज भरता येणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना अर्ज रिजेक्टचा मेसेज आला असेल, त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या त्रुटींची पूर्तता करून अर्ज समबीट करावा लागणार आहे.

दुसऱ्या फेरीचे वेळापत्रक

अर्जात बदल करणे : शुक्रवार ते रविवार

छाननीची प्रक्रिया : सोमवार ते मंगळवार

निवड यादी तयार करणे : बुधवार ते शुक्रवार

निवड यादीची प्रसिद्धी : शनिवार

प्रत्यक्ष प्रवेशाची कार्यवाही : शनिवार ते मंगळवार

पहिल्या फेरीतील प्रवेश निश्चिती

विज्ञान : २०६१

वाणिज्य मराठी : ६८५

वाणिज्य इंग्रजी : ६१२

कला मराठी : ५७१

कला इंग्रजी : ५०

Web Title: Ten thousand seats for the second round of the eleventh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.