Kolhapur: लग्नानंतर दहा वर्षांनी पूजा चव्हाण यांनी बारावी परीक्षेत मिळवले घवघवीत यश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2024 12:19 PM2024-05-22T12:19:14+5:302024-05-22T12:19:52+5:30
कोल्हापूर : एकदा लग्न होऊन अपत्ये झाली की अनेकांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. मात्र, महावीर महाविद्यालयाच्या बी. एम. रोटे ज्युनिअर ...
कोल्हापूर : एकदा लग्न होऊन अपत्ये झाली की अनेकांचे शिक्षणाकडे दुर्लक्ष होते. मात्र, महावीर महाविद्यालयाच्या बी. एम. रोटे ज्युनिअर कॉलेजमधील पूजा विठ्ठल चव्हाण यांनी लग्नानंतर तब्बल दहा वर्षांनी बारावीची परीक्षा देत घवघवीत यश संपादन केले. बारावी कला शाखेत ७८.३३ टक्के गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला.
जठारवाडी (ता. करवीर) येथील पूजा यांना शिक्षणाची आवड होती. मात्र, दहावीनंतर लग्न झाल्याने त्यांचे पुढील शिक्षणाचे स्वप्न अधुरे राहिले. पुढे दोन अपत्ये झाल्याने शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. त्यातच त्या प्रिटिंग कंपनीत नोकरीला लागल्या. घर, संसार अन् नोकरी याची सांगड घालताना त्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागले.
मात्र, त्यांच्या भावांनी त्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. यातूनच त्यांनी पुढे शिक्षण घेत बारावी परीक्षेत मोठे यश संपादन केले. ग्रामीण भागातून आलेल्या या मुलीने संसार व नोकरी सांभाळत मिळविलेल्या यशाचे कौतुक होत आहे.