आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापुरातील कागलमध्ये तणाव, पोलिसांनी तातडीने एकास घेतले ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 11:43 AM2023-06-12T11:43:31+5:302023-06-12T11:44:17+5:30

संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

Tension in Kolhapur Kagal due to offensive status, police immediately detained one | आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापुरातील कागलमध्ये तणाव, पोलिसांनी तातडीने एकास घेतले ताब्यात

आक्षेपार्ह स्टेटसमुळे कोल्हापुरातील कागलमध्ये तणाव, पोलिसांनी तातडीने एकास घेतले ताब्यात

googlenewsNext

कागल : येथील एका युवकाने आक्षेपार्ह स्टेटस आपल्या मोबाइलवर ठेवल्याने रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कागलमध्ये काही काळ तणाव निर्माण झाला. मात्र पोलिसांनी तातडीने कारवाई करीत या युवकाला ताब्यात घेतले, तसेच ठिकठिकाणी जमा होऊ लागलेल्या जमावाला पांगवले व परिस्थिती नियंत्रणात आणली.

येथील बॅ. खर्डेकर चौकात काही हिंदुत्ववादी कार्यकर्ते जमले होते. तेथे या स्टेटसची माहिती समजली. ते स्टेटस विविध ग्रुपवर फिरत गेले. त्यानंतर तरुण मोठ्या संख्येने जमा होऊन घोषणा देऊ लागले. स्टेटस ठेवणाऱ्या युवकाच्या घराकडे हा जमाव जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले आणि जमावाला विविध मार्गांनी पांगविले. संवेदनशील ठिकाणी पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मुस्लीम जमीयतचे प्रमुख पदाधिकारी, हिंदुत्ववादी संघटना, सकल मराठा समाज, व्यापारी असोसिएशनचे पदाधिकारी यांना पोलिस ठाण्यात बोलावून पोलिस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी या प्रकाराबद्दल चर्चा केली.

Web Title: Tension in Kolhapur Kagal due to offensive status, police immediately detained one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.