बेळगाव मनपासमोर ध्वज लावण्यावरून तणाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:29 AM2021-07-07T04:29:46+5:302021-07-07T04:29:46+5:30
बेळगाव दि ५ : बेळगाव मनपासमोर अनधिकृत लाल पिवळा ध्वज लावलेल्या ठिकाणी कानडी संघटनांनी सोमवारी पुन्हा एक लाल पिवळा ...
बेळगाव दि ५ : बेळगाव मनपासमोर अनधिकृत लाल पिवळा ध्वज लावलेल्या ठिकाणी कानडी संघटनांनी सोमवारी पुन्हा एक लाल पिवळा नवीन ध्वज लावण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मनपा समोर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
लाल पिवळा नवीन ध्वज लावणाऱ्या दहा कानडी संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले यावेळी कन्नड संघटनेच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या विरोधात घोषणाबाजी केली.
गेल्या वर्षी २८ डिसेंबर रोजी कन्नड कार्यकर्त्यांनी मनपा समोर कन्नड ध्वज स्तंभ उभा केला होता सदर ध्वज बेकायदेशीर असल्याचा आरोप करत महाराष्ट्र एकीकरण समितीने आंदोलन केले होते मात्र अद्याप या ध्वजाकडे जिल्हा प्रशासनाने कानाडोळा केला होता.
गेल्या सहा महिन्यांत हा ध्वज ऊन पावसाने फाटला आहे असे कारण सांगत नवीन ध्वज लावण्याचे निमित्त करून कानडी संघटनांनी जोरदार राडा केला.
गेल्या चार महिन्यापासून कोरोना काळात शांत असलेल्या बेळगाव शहरात सोमवारी आंदोलन करत पुन्हा एकदा गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. एकीकडे देश राज्य आणि बेळगाव कोरोनातून सावरत असताना दुसरीकडे आंदोलन मोर्चांना अद्याप बंदी असताना कन्नड संघटनांनी जोरदार राडा केला.
तीन महिने आवाहन करून देखील ध्वज बदलत नसल्याचा आरोप यावेळी कानडी संघटनांनी केला.
फोटो : बेळगाव मनपा समोर आंदोलन करणाऱ्या कन्नड कार्यकर्त्यांनी असे पोलिसांनी ताब्यात घेतले